शाळकरी मुलेही "गॅंगवॉर'च्या पावित्र्यात!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जुलै 2016

जळगाव - चित्रपटातील कथानकातून प्रभावित होऊन शालेय विद्यार्थ्यांमधील कथित प्रेमप्रकरणे समोर येत असताना चित्रपटांच्या प्रभावातूनच शालेय विद्यार्थ्यांच्या गॅंग बनून त्यांचा पवित्रा थेट हाणामारीपर्यंत गेला आहे. त्याचा प्रत्यय आज शहरात आला. शालेय विद्यार्थ्यांचे दोन गट आज समोरासमोर भिडले खरे, मात्र पोलिसांनी वेळीत सतर्कता दाखविल्याने अनर्थ टळला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील मुलांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले व नंतर "समज‘ देऊन सोडून देण्यात आले.

ब्लेड हल्ल्याचे निमित्त
आर.आर.शाळेत दहावीच्या वर्गात असलेल्या एका विद्यार्थ्यावर किरकोळ कारणावरून गेल्या महिन्यात शिवतीर्थ मैदानावर काही विद्यार्थ्यांनी ब्लेडने वार केले होते. शाळकरी मुलांचं भांडण आणि शैक्षणिक आयुष्य उद्‌ध्वस्त होईल यामुळे पालक व पोलिसांनी समजुतदारीची भूमिका घेत प्रकरण मिटवले होते.

बदल्याची भावना
मात्र या पोरांमध्ये खुन्नस कायम असून बुधवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे दोन्ही गट शिवतीर्थ मैदानावर येत हाणामारीच्या तयारीत होते. तत्पूर्वीच आर.आर.विद्यालयाच्या मागील प्रवेशव्दाराजवळच त्यांच्यामध्ये हमरीतुमरी सुरू झाली. वाद सुरू असताना त्याठिकाणाहून जात असलेल्या जिल्हापेठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विचारणा केल्यानंतर हाणामारीच्या तयारी असल्याची माहिती समोर आली. अल्पवयीन मुले असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना जिल्हापेठ पोलिसांनी बोलविल्यानंतर त्यांच्यासमक्ष समज देवून त्यांना सोडण्यात आले.

पालकही हैराण
गेल्या महिन्यात ब्लेडने वार केल्यानंतर पालकांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविण्यात आले. आता मात्र, तेच विद्यार्थी हाणमारीच्या उद्देशाने पुन्हा समोरासमोर आले. आजही पुन्हा या मुलांच्या पालकांना बोलाविण्यात आल्याने त्यांच्या डोक्‍याचा ताण वाढला आहे. चित्रपटातून प्रेरित होऊन विद्यार्थीही आता असे गंभीर प्रकार करु लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.