खाऊच्या पैशातून 'आठवणीचं झाड' जोपासण्याचा संकल्प

tree
tree

निफाड - वार्षिक परीक्षा संपून सर्वत्र निरोप समारंभाचे आयोजन सुरू आहे. वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील इयत्ता चौथीच्या कब - बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी मात्र अनोखा निरोप समारंभ साजरा केला. पहिलीपासून चौथी पर्यंत ज्या शाळेत आपण ज्ञानग्रहण केले, तेथील बालपणीच्या आठवणी कायम स्मरणात राहण्यासाठी 'आठवणीचं झाड' शाळेत लावून ते जोपासण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. मुले एवढ्यावरच थांबली नाही तर या चिमुकल्यानी आपल्या खाऊचे पैसे जमा करून झाडाच्या संरक्षणासाठी ट्रीगार्ड खरेदी करून मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. 

बेसुमार होणाऱ्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधण्यासाठी चिमुकल्यानी 'आठवणीचं झाड' लावून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या प्रसंगी मुलांनी झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा दारोदारी आरोग्य येईल घरोघरी, एक दोन तीन चार झाडे लावा फार फार, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त अँड. ल. जि. उंगावकर, वि. दा. व्यवहारे, राजेश सोनी, राजेंद्र राठी, किरण कापसे, अँड. दिलीप वाघावकर, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस.बी.थोरात, केंद्रप्रमुख व्ही. के. सानप व पालकांनी अभिनंदन केले. या उपक्रमासाठी शिक्षक गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. 

"आठवणींच्या झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प आम्ही मुलांनी केला आहे. या झाडांमुळे शाळेतील बालपणीच्या आठवणी कायम स्मरणात तर राहतीलच शिवाय पर्यावरणाचे रक्षण ही होईल". 
कु. साक्षी कुशारे, विद्यार्थीनी, वैनतेय विद्यामंदिर निफाड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com