सतरा शिक्षकांना महापालिकेचे पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

नाशिक - शिक्षक दिनाचे औचित्य साधून महापालिकेने आदर्श शिक्षक पुरस्कारांची आज घोषणा केली. यंदा सतरा शिक्षकांना आदर्श पुरस्काराने गौरविले जाणार असून, त्यात महापालिकेच्या शाळेतील बारा, खासगी शाळांमधील पाच शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी दिली. पुढील आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण केले जाईल. 

मनपातर्फे दर वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. गेल्या वर्षी तांत्रिक कारणामुळे पुरस्कार दिले नाहीत. यंदा प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसाठी सभापती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. प्रशासनाधिकारी नितीन उपासनी, समर्थ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या नीलिमा निकम, राष्ट्रपती पुरस्कारविजेते शिक्षक वि. का. धनाईत यांचा निवड समितीत समावेश होता. कार्यक्षम, उपक्रमशील व समाजोपयोगी शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

हे आहेत आदर्श शिक्षक 

मंगला शिंदे (मुख्याध्यापिका, शाळा ७०, आडगाव), बाळासाहेब कडलग (पदवीधर शिक्षक, विद्यानिकेतन १३, देवळाली गाव), मंगला शेलार (पदवीधर शिक्षिका, शाळा ९४, स्वारबाबानगर), चांगदेव सोमासे (उपशिक्षक, शाळा २६, शिवाजीनगर), पुंडलिक सोनवणे (मुख्याध्यापक, शाळा २०, रायगड चौक), गुलाम हुसेन अन्सारी (मुख्याध्यापक, शाळा १३२ , देवळालीगाव), मंगला मोरे (पदवीधर शिक्षिका, शाळा ८६, मखमलाबाद), संगीता मदने (उपशिक्षिका, शाळा ३३, आनंदवली), वैशाली लचके (पदवीधर शिक्षिका, शाळा सात, मखमलाबाद नाका), सुशीला पवार (उपशिक्षिका, शाळा ७०, आडगाव), भारती नांदूरकर (मुख्याध्यापिका, शाळा ३४, नांदूरगाव), संतोष गंगावणे (पदवीधर शिक्षक, विद्यानिकेतन ४), सचिन जोशी (शिक्षण अभ्यासक, इस्पॅलिअर स्कूल, नवीन नाशिक), बापूराव पवार (शिक्षक, सरस्वती विद्यालय), मीनाक्षी गायधनी (मुख्याध्यापिका, अभिनव विद्यामंदिर), मोहन माळी (उपशिक्षक, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर), आशा क्षीरसागर (श्रीराम मित्रमंडळ संचलित प्राथमिक विद्यामंदिर, आडगाव नाका).

Web Title: Seventeen public corporation teacher award