दानवेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे रस्तारोको

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

शिवसैनिकांनी परिवर्तन चौकात रस्त्यावर येवून दानवेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. रस्त्यावर वाहतूक रोखण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घातला

जळगाव -  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांसंबधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज जळगाव जिल्ह्यात उमटले. मुक्ताईनगर (जि.जळगाव )येथे शिवसेनेतर्फे रास्तारोको करण्यात आला. दानवे यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदनही पोलीस निरिक्षकांना देण्यात आले.

शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी परिवर्तन चौकात रस्त्यावर येवून दानवेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. रस्त्यावर वाहतूक रोखण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घातला. त्यावेळी पोलिसांनी हा पुतळा जप्त केला.

Web Title: Shiv Sena protests against Raosaheb Danve