शिवसेनेचे आठ मंत्री आज नाशिकमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नाशिक - राज्याचे आठ मंत्री उद्या (ता. 19) नाशिकमध्ये येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात ते सहभागी होतील.

उद्योगमंत्री सुभाष देसाई आज रात्री उशिरा नाशिकमध्ये मुक्कामी आले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम रात्री उशिरा शहरात पोचले. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत उद्या सकाळी येत आहेत.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील सप्तशृंगगडावर मुक्कामी पोचले. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, ग्रामीण गृहराज्यमंत्री अर्जुन खोतकर, ग्रामीण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर रात्री नाशिकमध्ये दाखल झाले. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर इगतपुरीत मुक्कामी पोचले आहेत.

Web Title: shivsena 8 minister today in nashik