नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

दराडे यांना ४०० मते तर अॅड.सहाणे यांना २३१ मते मिळाली आहे. अवघ्या ६४४ पैकी १३ मते बाद झाली आहे. ६३१ पैकी दराडे यांना विजयासाठी कोटा ३१६ आवश्यक आहे. हा कोटा पूर्ण झाल्याने दराडे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी राहिली आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या नरेंद’ दराडे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनता दल आघाडीचे अॅड .शिवाजी सहाणे यांच्यावर विजय मिळविला. दराडे यांच्या विजयानंतर सहकाऱ्यांनी एकच जल्लोष करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. 

दराडे यांना ४०० मते तर अॅड.सहाणे यांना २३१ मते मिळाली आहे. अवघ्या ६४४ पैकी १३ मते बाद झाली आहे. ६३१ पैकी दराडे यांना विजयासाठी कोटा ३१६ आवश्यक आहे. हा कोटा पूर्ण झाल्याने दराडे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी राहिली आहे.

तत्पुर्वी सकाळी आठला एका खोक्यात एकत्र मतपत्रिका केल्या त्याचे सुरवातीला बाद ठरू शकणाऱ्या मतपत्रिका काढून घेतल्या. त्यानंतर पंचवीसचे गठ्ठे करून ही प्रक्रिया सुरू झाली. उपजिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.  जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली होत असलेल्या मतमोजणीसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणीच्या परिसरात सध्या एकच जल्लोष दिसतो आहे. 

Web Title: ShivSena candidate Narendra Darade wins in Nashik Legislative Council election