मालेगावात भुसेंना धक्का; पंचायत समितीत शिवसेना-भाजपला प्रत्येकी सहा जागा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मालेगाव - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. रावळगाव व सौंदाणे या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडत भाजपने आपला झेंडा रोवला आहे.

पंचायत समितीत भाजप व शिवसेनेला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व अपक्ष या दोघांच्या हातात असून, ते कोणाला पाठिंबा देतात यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत.
जिल्हा परिषदेच्या रावळगाव, निमगाव, दाभाडी, सौंदाणे व कळवाडी गटात भाजपचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला फक्त झोडगे व वडनेर गटावर समाधान मानावे लागले. शिवसेनेला मोठा फटका बसला असून, भाजपने जोरदार कमबॅक केले आहे.

पंचायत समितीच्या 14 पैकी सत्तेसाठीचा आठ हा जादुई आकडा कोणालाही गाठता आला नाही. सौंदाणे, करंजगव्हाण, चिखलओहोळ, वडनेर, कळवाडी व डोंगराळे गणात शिवसेनेचे, तर रावळगाव, दाभाडी, झोडगे, पाटणे, वडेल व जळगाव गणात भाजपचे उमेदवार विजयी झाले. चंदनपुरी गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रतिभा सूर्यवंशी, तर निमगाव गणातून अनिल तेजा विजयी झाले. सत्तेसाठी या दोघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

Web Title: Shock to Bhuse in Malegaon