शटल बससेवेने आगाराच्या उत्पन्नात वाढ

शटल बससेवेने आगाराच्या उत्पन्नात वाढ

अर्ध्यातासात बस उपलब्‍ध झाल्‍याने प्रवाशांची सोय; अमळनेर, चोपडा येथून दररोज ११४ फेऱ्या

अमळनेर - प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाने राज्यातील अनेक आगारातून शटल बससेवा सुरू केली आहे. या शटल बस दर अर्धा तासाला धावत आहेत. येथील आगारातून पारोळा व शिरपूर, तर चोपडा आगारातून धुळे शटल बस सुरू झाली आहे. प्रवाशांचा यास चांगला प्रतिसाद लाभत असून, आगारांच्या उत्पन्नातही चांगली वाढ झाली आहे. 

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता परिवहन मंडळाकडून शटल बससेवा सुरू करण्यात आली आहे. यात राज्यभरात चांगला प्रतिसाद लाभला आहे. येथील आगारातून पारोळा व शिरपूर शटल बससेवा सुरू करण्यात आली आहे. पारोळ्यासाठी तीस बस लावण्यात आल्या आहेत. पारोळा बसच्या दिवसाला ४२ फेऱ्या होत आहेत. पहिली बस पहाटे सहाला सुटत असून दिवसभरात अर्धा तासाला बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायंकाळी सातला शेवटची बस उपलब्ध आहे. अर्धा तासात बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. प्रवाशांमध्ये समाधान व्यक्‍त होत आहे.

अमळनेर- शिरपूर चार शटल बस आहेत. एका बसच्या सुमारे सहा फेऱ्या होत आहेत. चार बस मिळून दिवसाला सुमारे ४८ बसफेऱ्या दिवसाला होत आहेत. शटल बसवर आगार व्यवस्थापनाकडून सेवेबाबत संदेशही नमूद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना शटल बस चटकन लक्षात येत आहे. आगाराच्या या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत होत आहे. चोपडा आगारातून धुळे शटल बस सुरू झाली आहे. चोपडा आगारातूनही धुळे शटल बस सुरू करण्यात आली आहे. दिवसाला २४ फेऱ्या होत असून, चोपडा, धुळे, अमळनेर परिसरातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. बस आगाराच्या उत्पन्नात यामुळे भरघोस वाढ झाली आहे. अमळनेर- पारोळा बसमुळे गेल्या आठ दिवसात सुमारे अडीच लाखांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. अमळनेर- शिरपूर, चोपडा- धुळे बसमुळेही सुमारे दोन लाखांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. 

अवैध प्रवासी वाहतुकीस आळा 
नजीकच्या तालुक्‍यांना शटल बससेवा सुरू झाल्याने अवैध प्रवासी वाहतुकीस आळा बसला आहे. अर्धा तासात बस उपलब्ध असल्याने पारोळा- अमळनेर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीस मोठा फटका बसत आहे. मात्र, या बस नियमित सुरू राहाव्यात. अनेक बस या जुन्या व नादुरुस्त असतात. या बसही बदलून नव्या बस उपलब्ध होणे गरजेचे आहे. अनेक बसच्या काचा फुटल्या असून, दरवाजे आसनांचीही दुरवस्था झाली आहे. याकडेही आगार प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com