रिमोट न दिल्याने रागाच्या भरात पत्नीचा डोक्‍यात दगड घालून खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

सिडको - पत्नीकडे रिमोट मागितला असता तिने तो न दिल्याने संतप्त पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्‍यात दगड घालून तिचा खून केला. अंबड परिसरात आज पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पती फरारी आहे.

सिडको - पत्नीकडे रिमोट मागितला असता तिने तो न दिल्याने संतप्त पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्‍यात दगड घालून तिचा खून केला. अंबड परिसरात आज पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पती फरारी आहे.

कारगिल चौक, दत्तनगर, अंबड येथे पांडुरंग लक्ष्मण मानवतकर (वय 35) हे गेल्या काही वर्षांपासून कुटुंबासह राहतात. ते वॉचमेन तसेच मजुरीचे काम करतात. काल (ता. 15) रात्री मानवतकर घरी आले त्या वेळी त्यांची पत्नी शोभा (वय 32) टीव्ही पाहत होती. त्या वेळी त्यांनी, मला टीव्ही पाहायचा आहे, असे सांगून शोभाकडे रिमोट मागितला. मात्र, शोभाने नकार दिल्याने पती- पत्नीचे भांडण झाले. रागाच्या भरात मानवतकर हे बाहेर निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान परत घरी आले व त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यानंतर त्यांनी उशीने तोंड दाबले व मोठा दगड आणून तो शोभाच्या डोक्‍यात घातला व घरातून पळून गेले. ही घटना त्यांच्या एका मुलीने पाहिली.

मानवतकर निघून गेल्यानंतर मुलीने तिच्या दोन्ही बहिणींनी उठवले. त्या सर्वांनी ही माहिती समोर राहणाऱ्यांना सांगितली. त्यानंतर पहाटे याबाबत अंबड पोलिसांना कळविण्यात आले. शोभा मानवतकर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. सौ. मानवतकर यांच्या मागे तीन मुली व पती असा परिवार आहे.

टॅग्स