शेतमालाला भाव नसल्याने परिस्थिती बिकट ; भाजीपाला जनावरांपुढे

The situation gets worse because the market does not have any rate to Agri Product
The situation gets worse because the market does not have any rate to Agri Product

तळवाडे दिगर : कोणत्याही शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. लग्नसराईचा हंगामही सुरु झाला आहे. घरातील लग्नकार्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने कर्ज काढून लग्न करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तर शेतमाल बाजार पाठविण्याच्या खर्चही निघत नसल्यामुळे भाजीपाला जनावरांपुढे चारा म्हणून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरु झाला आहे. शेतकऱ्यांच्या घरी लग्नकार्य जमली आहेत. परंतु आता पैसे आणायचे कोठून ? हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. नोकरदार नातेवाईकांकडून उसनवार नाहीतर खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन लग्नकार्य पार पडण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. सामुदायिक विवाह चळवळ थंडावल्याने गोरगरीब शेतकऱ्यांनाही मंगल कार्यालयात लग्न करावे लागत आहे. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा  होत आहे.

शेतकरी व्याजाने पैसे काढून हा खर्च करत आहे. उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांना सध्या बाजारभावाची साथ मिळाली नाही. याउलट पिकांसाठी गुंतविलेले भांडवल शेतकऱ्यांच्या अंगावर आले असून, कर्जाचा बोजा अजून वाढला आहे. उन्हाळी हंगामात टोमटो, काकडी, कोबी, फ्लावर, कलिंगड, मिरची, वांगी आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली. यासाठी ठिबक, मल्चिंग पेपर, रोप, औषध, लागवड, बांधणी, नीदनी, काढणी आदींसाठी लाखो रुपये भांडवल दोन पैसे मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. परंतु सध्या कोणत्याही पिकला बाजारभाव मिळत नाही ही परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून आहे. 

तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या थोड्याफार पाण्यात ठिबक सिंचनाच्या टोमटो, काकडी, कोबी, फ्लॉवर, कलिंगड, मिरची, वांगी आदी पिके घेतली. परंतु या पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळाला. गुंतविलेले भांडवलदेखील वसूल झाले नाही. टोमटो पिकला यंदा वातावरणाची साथ मिळाली. उत्पादनात चांगली वाढ मिळाली. परंतु टोमटो क्रेटला (वीस किलो) तीस ते चाळीस रुपये भाव मिळत आहे. त्यात बाजारापर्यंत नेण्याचा देखील खर्च निघत नाही. या कवडीमोल भावातून भांडवल अंगावर आले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात जनावर घातली तर काही ठिकाणी तोडणीच बंद केली. काहींनी बागा सोडून दिल्या आहेत.

कलिंगड पिकाने देखील सलग दुसऱ्या वार्षी शेतकऱ्यांची साफ निराशा केली असून, तीन ते चार रुपये किलो दराने कलिंगड विकले जात आहे. यातून खर्च वसूल होत नाही. शेतकऱ्यांनी कलिंगड तोडणीदेखील बंद केली आहे. काकडीला उन्हाळा असूनही चांगला दर मिळाला नाही. याशिवाय कोबी, फ्लॉवर, मिरची आणि वांगी या पिकांना देखील बाजारभावची साथ मिळाली नाही. सर्वच पिकांना कवडीमोल बाजारभावामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारी झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com