yeola
yeola

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिसरा आमदार येवला तालुक्याला मिळणारच

येवला - शिक्षकांच्या समस्या वर्षानुवर्षाच्या असून त्या मांडल्या जातात मात्र अनेक प्रश्न जैशे थे आहे. हे प्रश्न वेगाने सोडवण्यासाठी किशोर दराडे सारखा झोकून देऊन काम करणारा आमदार हवा आहे. विभागातील पाचही जिल्ह्यात संस्थाचालक, शिक्षक संघटना समर्थन देत असल्याने व जिल्ह्यातील एकमेव प्रबळ उमेदवार असल्याने यावेळी गणित सोपे असून, निवडणूक जिंकणारच आणि तिसरा आमदार या तालुक्याला मिळणारच. असा विश्वास जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करत असलेले येथील किशोर दराडे यांच्या समर्थनार्थ आज रविवारी आसरा लान्सवर झालेल्या संस्थाचालक व शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते एन.एम.आव्हाड होते. तर व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, माणिकराव शिंदे, माजी सभापती संभाजी पवार, सेनापती तात्या टोपे संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख यांच्यासह सर्व संस्थाचालक व मुख्याध्यापक पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात सर्व संस्थाध्याक्ष व शिक्षक संघटनांनी श्री.दराडे यांच्या मागे उभे राहून तालुक्यातून सर्वच्या सर्व मते तर जिल्ह्यातूनही सर्वाधिक मते मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

संपर्क व प्रश्न सोडवण्याची तळमळ असली की लोक नक्कीच पाठबळ देतात हे नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनुभवले आहे. आताही पाच जिल्ह्यातून प्रमुख संस्थाध्याक्षानी साथ देण्याचे आश्वासन दिले असून, यामुळे येथे तिसरा आमदार मिळण्याचे गणित जुळणार असल्याचा विश्वास आमदार दराडे यांनी व्यक्त केला.

शिक्षकांचे प्रश्न तर अनेक आहे ते हक्काने सोडवण्यासाठी उमदा, कार्यक्षम व कामाची चुणूक असलेला उमेदवार मिळाला आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी दोन नव्हे तीन आमदार लाभणार असल्याने तालुक्याची शान वाढवण्यासाठी दराडे यांच्यामागे संपूर्ण तालुका उभा राहील असे मविप्रचे संचालक अरुण काळे, नगरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस प्रमोद पाटील, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद नागडेकर, महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी प्राचार्य भाऊसाहेब गमे, मातोश्री शांताबाई सोनवणे संस्थेचे विश्वस्त मकरंद सोनवणे, टीडीएफचे अध्यक्ष शिवाजी भालेराव, साईराज संस्थेचे विश्वस्त भूषण लाघवे, अजिंक्यतारा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे संचालक बापूसाहेब पगारे यांनी सांगितले. शिक्षकांचे अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी दमदार शिक्षक प्रतिनिधी असावा अशी अपेक्षा व्यक्त करत येवल्याला तिसरा आमदार मिळण्यासाठी सर्वांनी कामाला लागू असे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सी.बी.कुळधर, मुख्याध्यापक प्रतिनिधी माणिक मढवई, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब पटाईत, शिक्षक नेते श्याम पाटील, दिगंबर नारायणे, सतिष पैठणकर, आनंदा वैद्य यावेळी बोलतांना म्हणाले.

मेळाव्याला विद्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश पटेल, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, दौलतराव कदम, महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी तुकाराम शेरमाळे, शिवाजी भालेराव, जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक अण्णासाहेब काटे, शिक्षक नेते साहेबराव घुगे, अरुण विभूते, पंडित मढवई, आर.डी.पाटील, एस.पी.नागरे, दत्ता वैद्य आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता महाले यांनी केले. अहिल्यादेवी होळकर संस्थेचे सरचिटणीस डॉ.सुधीर जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com