या चिमण्यांनो परत फिरा रे, घरट्यांकडे अपुल्या...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

नाशिक - एकेकाळी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकल्याशिवाय दिवसाची सुरवात होत नसे; परंतु सिमेंटच्या जंगलात चिवचिवाट कधीच हरवून बसला आहे. महापालिकेनेही चिमण्या व पाखरांची हक्काची स्थाने असलेल्या वृक्षांना शहरातून हद्दपार केल्याने, तर कधी काळी पाखरांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणून असलेली ओळख पुसत चालली की काय, अशी भीती निर्माण होत असतानाच आता महापालिकेनेच पुढाकार घेऊन वृक्षारोपण करताना चिमण्या व पाखरांचा किलबिलाट पुन्हा ऐकू येईल, अशी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. 

वृक्षारोपणात पारंपरिक व पर्यावरणपूरक असलेली बाभुळ, चिंच, वड व लिंब अशा प्रकारची वृक्षे नाशिकच्या मातीत दिसू लागणार आहेत. नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यावर शहरात ‘हरित नाशिक’चा नारा देण्यात आला होता. नाशिक हरित करताना झपाट्याने वाढणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. त्यात गुलमोहर, रेन ट्री, टेल्ट्राफोरम, स्टॅटोडिया (पिंचकारी), ग्लेरिफिडिया (गिरीपुष्प), अरेशिया अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. यामुळे शहराला काही काळापुरता हरित चेहरा मिळाला असला, तरी अशा प्रकारच्या वृक्षांमुळे निसर्गचक्र बिघडल्याचेही समोर आले आहे. त्याचा सर्वाधिक फटका पाखरांना बसला आहे. चिमण्या, पाखरांचा किलबिलाट पुन्हा ऐकू येण्यासाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी बाभुळ, बकुळ, आंबा, बांबू, बहावा, पळस, असाणा, मोर, कळम अशा प्रकारची झाडे लावली जाणार आहेत.
 
वास्तव्यायोग्य झाडांची तोड कारणीभूत
बाभुळ, बकुळ, आंबा अशा प्रकारच्या झाडांवर चिमण्या, पाखरांचा वावर कायम असतो; परंतु शहरात अशा प्रकारची झाडे कमी झाली आहेत. शिकारी पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी बाभळीचे झाड योग्य असते. पण, ती झाडे गायब झाल्याने चिमण्यांचे वास्तव्य कमी झाले आहे. त्याशिवाय पाखरे कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यात कौलारू घरांची रचना संपुष्टात येऊन सिमेंटची घरे तयार होऊ लागल्याने पक्ष्यांचा आडोसा कमी झाला. खिडक्‍या व तावदानांना डासांमुळे जाळ्या लावण्यात आल्याने चिमण्यांना घरांमध्ये प्रवेश बंद झाला. मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे परिणाम झाल्याचे सांगितले जात असले तरी ते पूर्णतः चुकीचे असून, वास्तवात योग्य वृक्ष कमी झाल्यानेच पाखरांची संख्या कमी झाल्याचे पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड 
यांनी सांगितले.

Web Title: sparrow