चिमण्या वाचवण्यासाठी सरसावले चिमुकल्यांचे हात

sparrows
sparrows

तळवाडे दिगर (नाशिक) : ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ ‘एक घास चिऊचा..’ अशा चिऊताईच्या अनेक गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. जणू ती आपल्या घरातील एक सदस्यच होती. मात्र वाढती जंगलतोड आणि वाढते शहरीकरणामुळे पर्यावरणाच्या सुरक्षा साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या चिमणीची संख्या कमी झाली आहे.

मोबाईलच्या टॉवरमुळे ही संख्या कमी झाली असल्याचे काहींचे म्हणणे असले, तरी याला अद्याप शास्त्रीय आधार मिळालेला नाही. सिमेंटची जंगले, वृक्षतोड यामुळे चिमण्यांच्या अधिवासावर गदा आली असून त्यांची संख्या या कारणामुळे नक्कीच कमी झाली आहे. चिमणीची संख्या वाढावी यासाठी खमताणे येथील गुरुकुल कॅम्पसमधील सरसावले आहेत.

खमताणे परिसरातील सर्व नदी,नाले,तलाव यांच्यातील पाणीसाठा संपला आहे तसेच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे परिसरातील अनेक पशुपक्ष्यांना अन्न आणि पाणी मिळावे यासाठी प्राचार्य जितेंद्र आहेर यांच्या संकल्पनेतून कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जागतिक चिमणी दिनाचे अवचित साधून विद्यार्थ्यांना चिमण्यांची मार्गदर्शन करून टाकाऊ वस्तूपासून चीमण्यासाठी अन्न व पाण्याची सोय करण्याचे ठरवले.

कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे असून त्यांच्यावर अनेक पक्षांचे वास्तव्य आहे. ते टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी टाकाऊ पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, ड्रम, डबे, चमचा, तार, दोरी आदी टाकाऊ वस्तू कापून त्यांना टांगण्यासाठी दोऱ्या बांधल्या व तयार केलेल्या भांड्यात गहू,बाजरी, तांदूळ, हे धान्य टाकून कॅम्पसमधील पंधरा ते वीस झाडाला टांगण्यात आले.

चिमण्यांना कावळ्यासारख्या शेत्रूचा सामना करावा लागतो.तर झाडावर साप व इतर पक्षी चिमण्यांची अंडीही खाऊन टाकतात. १५ ते २० वर्षापूर्वीची धान्यांची मळणी खळ्यात चालायचे. खळ्यांच्या आजूबाजूला पडलेले धान्य टिपण्यासाठी चिमण्यांची गर्दी होत असे, परंतु आत्ता खळेच मोडीत निधाल्याने चिमण्यांची धान्याची सोय संपली. त्यामुळे त्यांची उपासमार होते.विलक्षण नाजूक असलेल्या चिमण्यांचा उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी तडफडून मृत्यू होतो.त्यांना जीवनदान देण्यासाठी आम्ही आमच्या ‘माणूस घडविणाऱ्या गुरुकुल’मध्ये आज पंधरा ते वीस झाडाला चिमण्यांसाठी अन्न व पाण्याची सोय केली आहे., असे प्रा. जितेंद्र आहेर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com