आता मोबाईल ऍपवर "एसटी'चा माग शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

जळगाव - दूरवरून राज्य परिवहन महामंडळाची लाल बस दिसली, की ही आपल्याच गावाला जाणारी तर नाही ना? हे पाहण्यासाठी प्रवासी थांब्यावर उठून पुढे येतात. हे चित्र प्रत्येक बसथांब्यावर पाहण्यास मिळते; पण आता बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांना आपली बस कुठपर्यंत आली, याचा शोध बसल्याजागी "स्मार्टफोन'वर घेता येणार आहे. यासाठी बसमध्ये "व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम' बसविण्यात येणार आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. बसस्थानकात लावण्यात आलेले वेळापत्रकदेखील जुने झाले आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असतो. शिवाय, थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना बसबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसते. यामुळे बस कधी येणार? याची केवळ प्रतीक्षा करीत थांबावे लागते. हे सर्व चित्र बदलविण्यासाठी आणि "एसटी'चे वेळापत्रक सुधारण्यासाठी, अनधिकृत थांब्यांना आळा घालण्यासाठी गेल्या वर्षभरापासून "व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम' या यंत्रणेवर महामंडळाकडून काम सुरू आहे. या नवीन सिस्टिममुळे प्रवाशांना बसची माहिती स्मार्टफोनवरून घेता येणार आहे. 

नाशिक विभागात पहिला प्रयोग 
महामंडळाकडून नवीन यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दिवाळीपासून ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. यंत्रणेचा पहिला प्रयोग नाशिक विभागात करण्याचा निर्णय महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. नवीन यंत्रणा बसविताना राहणाऱ्या त्रुटी, अडचणी आणि अभिप्राय घेऊन त्यात आणखी सुधारणा केल्या जातील. यानंतरच राज्यातील अन्य आगार व बसस्थानकांत यंत्रणा बसविली जाणार आहे. 

Web Title: ST bus on the mobile app