एसटी कर्मचारी संपामुळे सटाण्यात प्रवाशांचे हाल 

ST employees  due to strike
ST employees due to strike

सटाणा : सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे व इतर प्रलंबित प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी काल (शुक्रवार) पासून बेमूदत संप पुकारला  आहे. आज दुसऱ्या दिवशीही संपाला पाठींबा देत येथील आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरूच ठेवले. गेल्या दोन दिवसांपासून एसटीचा संप असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत असून खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी प्रवाशांची लुट चालविली आहे. तिप्पट ते चौपट भाडे देत आपापल्या गावी परतणाऱ्या विद्यार्थी, पालक व सर्वसामान्य प्रवाशांना या संपाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाचे कर्मचारी अत्यंत कमी वेतनामध्ये दिवसरात्र काम करीत आहेत. वारंवार मागणी करूनही शासनाकडून वेतनवाढ करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने एस.टी.च्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य व असंतोषाचे वातावरण पसरले आहे. एस.टी. कर्मचार्यांजना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे यांसह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला असून मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कामावर रुजू न होण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 


सटाणा आगारातील २७७ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणारी बससेवा संपामुळे ऐन सुट्टीत अचानक ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. आज सकाळी १० वाजता येथील आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करून शासनाचा निषेध केला व आगारातील दत्त मंदिरात ठिय्या दिला. संपामुळे येथील आगारातील ७४ बसेस जागेवरच उभ्या होत्या. शिवसेना प्रणीत कामगार संघटनेचे कर्मचारी या संपात सहभागी न झाल्याने आज सकाळी नाशिक व मालेगावसाठी चार बसेस व्यतिरिक्त दिवसभरात बसस्थानकातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बसस्थानकात शुकशुकाट आहे.
संपामुळे दोन दिवसांपासून ८०० बसफेऱ्या रद्द झाल्या असून आगाराचे १६ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 
संपात सहभागी असलेले येथील आगारातील सर्व कर्मचारी कालपासून आगारात बसून आहेत. संपाबाबत राज्य शासन काही निर्णय घेते का, याची प्रत्येक तासाला माहिती घेतली जात होती. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत शासनाचा तीव्र निषेध नोंदविला.   

शिवसेना प्रणीत कामगार संघटनेचे कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाही. आज सकाळी हे कर्मचारी नाशिक व मालेगावसाठी बसेस बाहेर काढत असताना संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी चालक व वाहकांना बस बाहेर काढू नये यासाठी विरोध केला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यांचा विरोध झुगारून या कर्मचाऱ्यांनी नाशिक व मालेगावसाठी ४ फेऱ्या केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com