नांदगावला वादळवाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नांदगाव (जि. नाशिक) - शहरात मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अनेकांची धांदल उडाली. जोरदार वाऱ्यासोबत आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत धावपळ उडाली होती. वाऱ्यामुळे शहराच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडली; तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात व्यापाऱ्यांच्या खळ्यातील पत्र्यांच्या शेडचे मोठे नुकसान झाले. लाखो रुपयांचा कांदा भिजला. नुकसानाचा पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, मालेगाव रस्त्यावरील वडाचे जुने झाड उन्मळून पडल्याने त्याखाली उभ्या असलेल्या दुचाकीचे नुकसान झाले. तसेच राज्य महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिस ठाण्याच्या आवारातही झाड कोसळले. अन्य ठिकाणीही झाडे कोसळली. तालुका कृषी कार्यालयाच्या एका विभागाच्या छताचे पत्रे उडून गेले. सोमवारी (ता. 22) दुपारीही येथे तुरळक पाऊस झाला होता. आज सोसाट्याचा वारा व ढगांच्या गडगडाटासह जवळपास अर्धा तास पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून हवेत कमालीचा उष्मा जाणवत होता. पावसामुळे आता हवेत गारवा जाणवू लागला आहे.

उत्तर महाराष्ट्र

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नाशिक - ठेकेदारांमध्ये काम खेचण्यासाठी लागलेली स्पर्धा व त्यातून निर्माण होणारा संघर्ष, काम मिळाल्यानंतर महापालिकेच्या प्रत्येक...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017