अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या गौणखनिज माफियांवर सक्त कारवाई

WhatsApp-Image-2018-10-14-a.jpg
WhatsApp-Image-2018-10-14-a.jpg

घोटी : तालुक्यात अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या गौणखनिज माफियांवर सक्त कारवाईचे आदेश तहसीलदार वंदना खरमाळे यांनी दिले आहे. वाहतूक दारांनी नियमानुसार शासन रॉयलटी भरून शासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दारणा नदीच्या पात्रातून ( ता. १३ ) शनिवारी दुपारी बारा वाजेदरम्यान कांचनगाव येथील परिसरात अवैध वाहतूक मोठ्याप्रमाणावर होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार वंदना खरमाळे आपल्या पथकासह रवाना झाल्या. तिथे पोहचता क्षणी ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने अवैध वाहतूक दारांची चांगलीच भंभेरी उडाली.

महिला तहसिलदारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांनी तेथून धूम ठोकली. पकडलेले ट्रॅक्टर घोटी पोलीस ठाण्यापर्यंत आण्यासाठी त्यांनी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत तालुक्यात चोरट्या पद्धतीने गौणखनिज वाहतूक होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी अथवा सरपंच,ग्रामसेवक यांनी तत्काळ तहसीलदार कार्यालयात कळवावी असे आवाहन तहसीलदार श्रीमती खरमाळे यांनी केले. एकीकडे आदेश व दुसरीकडे थेट  कारवाही करण्यात आल्याने गौणखनिज माफियांची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.

''वाहतूकदारांनी रीतसर रॉयलटी भरावी, शासनाची रॉयलटी बुडविणाऱ्या माफियांवर लक्ष केंद्रित करणार आहे. शासन निर्नेयाची अंमलबजावणी न केल्यास यापुढे ही धडक कारवाई अशीच सुरु राहणार आहे. ''
- वंदना खरमाळे , तहसीलदार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com