'सुला फेस्ट' दशकपूर्ती उत्सवाच्या वाद्यांची सुला विनयार्डतर्फे घोषणा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

नाशिक : सुला विनयार्डतर्फे 3 ते 5 फेब्रुवारी 2017 ला 'सुला फेस्ट होणार आहे.

दशकपूर्तीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या वाद्यांची आज घोषणा करण्यात आली. सुला फेस्टमध्ये जगभरातील कलाकारांच्या संगीताच्या तालावर संगीतप्रेमींना आनंद लुटता येणार आहे. स्विंग ग्रोवर्स इलेक्‍ट्रो-स्विंग बॅंड आणि प्रोग्रेसिव्ह प्रिन्सेस नावाने गाजत असलेला टेक्‍नो कलाकार प्रियांजना यांचीही हजेरी असेल. 

जागतिक दर्जाचे फ्यूजन, इलेक्‍ट्रो ऍकॉस्टिक, टेक्‍नो, पॉप, इलेक्‍ट्रॉनिका, इलेक्‍ट्रॉ स्विंग, डिस्को, गराज, रॉक, तालवाद्य, ईडी, रेगा, आफ्रो, आयरिश आणि बास अशा वाद्यांचे कलाकार सुला फेस्टमध्ये सहभागी होतील. उत्तर आयर्लंडचे (इंग्लंड) 'अ पिंच ऑफ स्पाइस' वाले टेक्‍नो ईयूओ लोको आणि जॅम हे मुख्य आकर्षण असेल. 'ग्लास्तोनबरी युरोसॉनिक'सारख्या संगीत महोत्सवात हजेरी लावणारा 'ईयूबीओझा कलेक्तिव्ह' हा बोस्नियाचा बॅंड फेस्टची रंगत वाढविणार आहे. बाल्कन या युरोपियन, रेगी या जमैकन आणि स्का ऍण्ड पन्क या आफ्रिकन फ्यूजन अशा विविध शैलीच्या संगीतात बोस्नियन बॅंडने लोकप्रियता मिळविली आहे. आफ्रोसेल्ट साउंड सिस्टिम अथवा एसीएसएस या नावाने ओळखला जाणारा समूह ऍफ्रो, आयरिश, इलेक्‍ट्रॉनिक आणि जगाला जोडणारा आहे. न्यूक्‍लिया या भारतीय इलेक्‍ट्रॉनिका समूहच्या ठेक्‍यावर ताल धरता येणार आहे. 

आवश्‍यक द्या भेट! 
साउंड ऑफ सुला फेस्ट ऐकण्यासाठी https://youtu.be/QSSQ.POosLk 
तिकीट विक्री 'बुक माय शो'वर सुरू. 
अधिक माहितीसाठी www.sulafest.com #sulafest

Web Title: Sula Vineyards to arrange 'Sula Fest' at Nashik