सुरत-भुसावळ मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

नंदुरबार - पाचोराबारी (ता. नंदुरबार) गावाजवळ रेल्वे ट्रॅक खचून उखडलेल्या रुळामुळे सुरत- भुसावळ रेल्वेमार्गावरील ठप्प झालेली वाहतूक आजपासून सुरू झाली आहे. सकाळी साडेसहाला घटनास्थळी पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून वाहतूक सुरू करण्यात आली.

पाचोराबारी गावाजवळ १० जुलैला रात्री ढगफुटीमुळे रेल्वे रुळाचा ट्रॅक तीन किलोमीटरपर्यंत खचला होता. त्यामुळे सुरत- नंदुरबार पॅसेंजरचे पाच डबे रुळावरून घसरले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ डबे घसरल्याचे पाहून घाबरलेल्या तीन जणांनी उडी मारली होती. त्यांना किरकोळ जखम झाली होती. मात्र, रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नंदुरबारसह सुरत, गोध्रा, मुंबई येथील तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. त्यांच्यासोबत रेल्वेचे अभियंता, तांत्रिक अधिकारी, पोलिस प्रशासन, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तेथे तळ ठोकला होता.

उत्तर महाराष्ट्र

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नादुरुस्त बसगाड्यांची संख्या अधिक असल्याने त्या उभ्या आहेत. आमच्या हाताला काम नाही,...

12.12 PM

नाशिक - गेल्या वर्षाच्या तुलनेत शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी असून, आजार नियंत्रणात असल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभागाचा...

12.12 PM

नगरसेवकांकडून औषध फवारणीचे प्रमाणपत्र बंधनकारक; दंडात्मक कारवाईचा उगारला बडगा नाशिक - सणासुदीच्या प्रारंभीच शहरात डेंगी,...

12.12 PM