देशातील 407 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास- सुरेश प्रभू

Suresh Prabhu
Suresh Prabhu

नाशिक - देशभरातील 407 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास होणार आहे. पहिल्या टप्प्यात 23 रेल्वे स्थानकांची घोषणा आज करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील 6 रेल्वे स्थानके सामील आहेत. नाशिकसह ÷उत्तर महाराष्ट्रातील अकरा स्थानकाचा समावेश आहे. 

दुसऱ्या टप्प्यात नाशिक सोबत, अकोला, अमरावती, बडनेरा, भुसावळ,चाळीसगाव, जळगाव, कुरवा, लातूर, मनमाड, मिरज, नाशिक रोड, पनवेल, साईनगर, शेगाव, नगर (मध्य रेल्वे), दौंड, कोल्हापूर, कोपरगाव, लोनावळा, बल्लारशा, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद, जालना, नगर (दक्षिण मध्य रेल्वे), परभणी, गोंदिया, सीएसटी मुंबई, नागपूर, कल्याण, दादर, सोलापूर यासह 23 रेल्वेस्थानकांचा टप्प्या-टप्प्याने पुर्नविकास होणार आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात 6 स्थानक 
रेल्वेच्या पुर्नविकास कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. आज केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल भवनात झालेल्या कार्यक्रमात देशातील 407 रेल्वे स्थानकांच्या विकासाच्या कार्यक्रमाची घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील पुर्नविकासात बॉम्बे सेंट्रल (बीसीटी), लोकमान्य टिळक टर्मिन्सल (एलटीटी), ुपुणे जनंक्‍शन, ठाणे, बांद्रा टर्मिन्लस, बोरीवली, या 6 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे स्थानकांच्या पूर्नविकासाकरिता खुल्या निविदा मागविल्या जातील. रेल्वेस्थानक विकास कार्यक्रमात निवडलेल्या स्थानकात ए वन आणि ए श्रेणीच्या स्थानकांची निवड केली आहे. तसेच, प्रामुख्याने महानगरे, प्रमुख शहरे, स्मार्ट सिटी, अमृत योजनेत सामील होणारी शहरे, पर्यटन आणि धार्मिक ठिकाणांवरील शहरांचा यात समावेश आहे. 

45 वर्षे लीजवर 
रेल्वेस्थानक पुर्नविकासात रेल्वेकडून विकसकांना, अधिकाधिक 140 एकरापर्यत जमीन 45 वर्षाकरिता विकासकांना लीजवर देण्यात येईल. यासाठी रेल्वेने झोननुसार नोडल अधिका-यांची नेमणुक केली आहे. जे विकासकांसोबत चर्चा करतील. या रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास लीलावाव्दारे निश्‍चित केला जाईल.प्रथम टप्प्यातील रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासासाठी जवळपास 6000 ते 9000 कोटी रूपयें खर्च होऊ शकतात, असा अंदाज बोस्टन कन्सल्टंट ग्रुपने व्यक्त केला आहे. रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासामध्ये रेल्वे प्रवाश्‍यांना अधिकाधिक सोयी सुविधांचा प्रयत्न असेल. रेल्वे स्थानकांवर औषधी केंद्र, खरेदी केंद्र, खादयपदार्थांचे दालन, डिजीटल स्वाक्षरी, इलेक्‍ट्रीकल पाय-या, स्वंय तिकीट काउंटर, आरामदायक लाउंज, लगेज स्क्रीनींग मशीन, मोफत अथवा सशुल्क वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com