अखेर "ते' पोलिस कर्मचारी निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नाशिक - नाशिक तालुका पोलिस ठाण्यातून गेल्या सोमवारी (ता. 15) सायंकाळी घरफोडीतील संशयिताने पलायन केले होते. अद्यापही त्यास अटक करण्यात न आल्याने पोलिसांची नाचक्की होत असताना तब्बल आठवडाभरानंतर आज सायंकाळी याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महिला पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांना निलंबित करण्यात आले. 

याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी संशयित कवळेचा शोध घेतला; परंतु आठवडाभरानंतरही तो गवसलेला नाही. तर दुसरीकडे या घटनेशी संबंधित तीन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती. परंतु, आठवडा उलटूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. यासंदर्भातील बातमी आजच्या "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी वृत्ताची दखल घेतली आणि आज सायंकाळी पोलिस नाईक दर्शन कोहली व पोलिस शिपाई वसंत निचित यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

लाखलगाव शिवारातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केली होती. यातील एक संशयित संभाजी कवळे याने नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या हददीतील मातोरी येथे घरफोडी केली होती. याप्रकरणी तालुका पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता. चौकशीसाठी त्यास तालुका पोलिस ठाण्यात गेल्या सोमवारी आणले आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याने बेड्यातून हातचलाखीने सुटका करून घेतली आणि रेकॉर्ड रूमच्या भिंतीवरून उडी घेऊन फरारी झाला होता.