सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो? 

सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो? 

नाशिक - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील खासदारांच्या घरापुढे रविवारी धरणे धरण्यात आले.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह दोन्ही खासदारांच्या घरांपुढे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या घरापुढील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सहभागी होऊन रंगत आणली. 

शेतमालाला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे आदी मागण्यांसाठी रविवारी पालकमंत्री महाजन यांच्यासह खासदारांच्या घरासमोर धरणे आंदोलनात शेतकरी संघटनेसह विविध पक्षसंघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. 

आंदोलनाने रंगत 
खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या कॉलेज रोड येथील पाटील लेनमधील आंदोलनात आमदार झिरवाळ यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांचे "सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो?' हे गीत सादर करीत धम्माल उडवून दिली. झिरवाळ यांनी गीत गाण्यास सुरवात करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी ठेका धरत गर्दी केली. अखेर खासदार चव्हाण यांनी आंदोलकांचे स्वागत करत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या खडकाळी सिग्नल येथील कार्यालयाबाहेर आंदोलन झाले. खासदार गोडसे यांनीही सर्वांची भेट घेऊन मागण्यांशी सहमती दर्शविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com