२१ दिवसांत १२६ जणांना डेंगीचा डंख

Dengue
Dengue

नाशिक - शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी तब्बल तिप्पट रुग्ण वाढले आहेत. सप्टेंबरमधील २१ दिवसांत १२६ डेंगीबाधित रुग्ण असून, महापालिकेला प्राप्त झालेली आकडेवारीपेक्षाही अधिक रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

वर्षभरात डेंगीसदृश आजाराचे एक हजार ७५५ रुग्ण आढळले आहेत. 
स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंगीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ सप्टेंबर २०१७ या कालावधीत डेंगीसदृश्‍य आजाराचे ६९२ रुग्ण आढळले होते. त्यातील ३२६ डेंगीबाधित रुग्ण असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले होते. १ जानेवारी ते २१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत डेंगीसदृश्‍य आजाराचे एक हजार ७५५ रुग्ण आढळले असून, त्यातील ४९४ जणांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सप्टेंबर महिन्यातच तब्बल १२६ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये ६८, जुलैत १०३, तर ऑगस्ट महिन्यात १४८ रुग्ण आढळले होते. सर्वाधिक ९५ रुग्ण सातपूर विभागात आढळून आले असून, त्यानंतर पंचवटी-८७, पूर्व-५७, सिडको-५६, नाशिक रोड-४८, तर पश्‍चिम विभागात २७ जणांना डेंगीची लागण झाली. महापालिकेने शहरातील दहा प्रभाग डेंगीचे ‘डेंझर झोन’ जाहीर केले असून, यात १, २, ९, १०, २०, २१, २३, २५, ३०, ३१ या प्रभागांचा समावेश आहे.

स्वाइन फ्लूचा आकडा वाढला
शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ८७ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेने आठ हजार ७८० संशयित रुग्णांची तपासणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com