तलवारबाजीचे पहिले प्रशिक्षण केंद्र धुळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

धुळे - आत्मसंरक्षणासाठी आवश्‍यक असलेले आणि ऑलिंपिक मान्यताप्राप्त तलवारबाजी प्रशिक्षण घेणे सर्वसामान्यांना न परवडणारे असते. कित्येकदा पात्रता असूनही अनेक खेळाडूंना संधी मिळत नव्हती. तलवारबाजीतही खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करावा, या उद्देशाने राज्यातील पहिल्या सरकारी तलवारबाजी प्रशिक्षण केंद्राचे येथे उद्‌घाटन झाले.

प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्याहस्ते उद्‌घाटन होऊन या प्रशिक्षण केंद्रास सुरवात झाली. जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये असलेल्या या तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रात एकावेळी शंभर मुले प्रशिक्षण घेऊ शकतील अशी सुविधा उपलब्ध आहे. येथे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. या केंद्रात प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्‍य दुधारे यांची सरकारने नियुक्‍ती केली आहे.

Web Title: sword first training center in dhule