जलिकट्टूसाठी नाशिकमध्ये तमिळ लोकांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

नाशिक : तमिळ संस्कृतीतील लोकप्रिय व पारंपरिक महोत्सव असलेल्या जलिकट्टू या उत्सवाच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये स्थित तमिळ नागरिकांनी निदर्शने केली. 'पेटा'तर्फे या प्रथेवर घातल्या जाणाऱ्या निर्बंधाचा निषेध यावेळी जमलेल्या तमिळ बांधवांनी केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या नावे निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आज सकाळी फलक घेऊन तमिळ नागरिक उपस्थित झाले होते. कुटुंबातील चिमुरड्या सदस्यांपासून तर घरातील ज्येष्ठ अशा सर्व वयोगटातील समाज बांधव-बगिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या निदर्शनांत सहभाग नोंदविला. जलीकट्टू या तमिळ संस्कृतीतील प्रथेचा सर्व तमिळ बांधव आदर करतो. पेटा मार्फत जलीकट्टूच्या आयोजनावर घातल्या जाणाऱ्या निर्बंधाचा आम्ही सर्व निषेध करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चेन्नईसह तामिळनाडूमध्ये जलिकट्टूच्या समर्थनार्थ व पेटाच्या निर्बंधाविरोधात निदर्शने होत असतांना नाशिकमध्ये स्थित तमिळ बांधवांतर्फे तामिळनाडूमधील समाज बांधवांना पाठिंबा देत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी डॉ. रामचंद्रन के., के.व्ही. विनोथ कोमार, आर. रामाकृष्णन, ए. रमेश, के. चित्रादेवी, बी. भाग्यलक्ष्मी आदींसह समाज बांधव उपस्थित होते.