नेतृत्व विकास कार्यक्रमात तनिष्का सदस्यांची निवड

 Tanishka leadership development program
Tanishka leadership development program

शिरपूर/निजामपूर - "सकाळ माध्यमसमूहा'च्या "तनिष्का' व्यासपीठांतर्गत काल (ता. 14) जिल्ह्यातील पाच केंद्रांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज घोषित झाला. निकालानंतर तनिष्का सदस्यांनी एकच जल्लोष केला. निवडणुकीत प्रथम व द्वितीय क्रमांकाची मते मिळविलेल्या सदस्यांचा सत्कार झाला. दरम्यान, या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार प्रथम व द्वितीय क्रमांकाची मते मिळालेल्या सर्वच भगिनींनी व्यक्त केला.

तनिष्का व्यासपीठातर्फे जिल्ह्यातील शिरपूर, निजामपूर, जैताणे, छडवेल कोर्डे, चिपलीपाडा या पाच केंद्रांवर काल मतदान झाले. प्रत्यक्ष मतदानाबरोबरच ऑनलाइन (टोलफ्री क्रमांक) मतदानाची सुविधाही उपलब्ध होती. त्यामुळे निवडणुकीत मोठी चढाओढ दिसून आली. प्रत्यक्ष झालेले मतदान आणि टोल फ्री क्रमांकांवरील मतदानानंतर आज निकाल घोषित झाला. यात प्रथम, द्वितीय क्रमांकाची मते असा निकष होता. निकाल घोषित झाल्यानंतर सर्व तनिष्कांनी जल्लोष केला.

शिरपूरला मतमोजणी
शिरपूर ः येथील डॉ. व्ही. व्ही. रंधे इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर मतमोजणी झाली. ऑनलाइन व प्रत्यक्ष मतदानातील मतांची मोजणी करून निवडणूक अधिकारी प्रमोद गजानन पाटील यांनी निकाल जाहीर केला. निवडणुकीत हर्षाली रोहित रंधे यांना प्रथम क्रमांकाची, तर पद्मा यतीन सूर्यवंशी यांना द्वितीय क्रमांकाची मते मिळाली. डॉ. रंधे इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या मनीषा सूर्यवंशी यांनी हर्षाली रंधे व पद्मा सूर्यवंशी यांचे औक्षण केले. उभयतांनी आशाताई रंधे यांचे आशीर्वाद घेतले. तनिष्का गट, रंधे परिवार, किसान विद्याप्रसारक संस्था परिवारातील महिलांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. विविध पदाधिकाऱ्यांतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन हर्षाली रंधे, पद्मा सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी प्राचार्या सूर्यवंशी, प्राचार्या कामिनी पाटील, प्रा. जी. व्ही. पाटील, प्रा. प्रशांत चौधरी, गायत्री शिंपी, मयूरी राजपूत, कंचन गुजर, शीतल चव्हाण, बेबीबाई चौधरी, वंदना सैंदाणे, उमेश एंडाईत, निलेश बडगुजर, सचिन नाईक, मनोज बोरसे, मोहनीश तायडे, राजसिंह सिसोदिया, पिंटू भावसार, शरद महाजन यांनी सहकार्य केले.

निजामपूरला जल्लोष
निजामपूरला प्रा. डॉ. रवींद्र ठाकरे, प्रा. मंगेश जाधव, जैताणे येथे प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. शोभा उपाध्ये, प्रा. सखाराम सोनवणे, चिपलीपाडा येथे निवृत्त शिक्षक एस. आर. चौधरी, अरुण सूर्यवंशी, गौरी गांगुर्डे, छडवेल कोर्डे येथे निवृत्त मुख्याध्यापक यू. एल. बोरसे, प्रतिभा साळुंखे, मनीषा बोरसे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली. निजामपूर गटातून उषाबाई हरी ठाकरे यांना प्रथम, तर मालूबाई राजेंद्र शिरसाट यांना द्वितीय क्रमांकाची मते मिळाली, छडवेल कोर्डे गटात संगीता गोकुळ साळुंखे यांना प्रथम, तर भाग्यश्री अजित बेडसे यांना द्वितीय क्रमांकाची, चिपलीपाडा गटात लीला मोहन सूर्यवंशी यांना प्रथम, तर सीमा मोहन चौधरी यांना द्वितीय क्रमांकाची, जैताणे गटात छाया प्रमोद कोठावदे यांना प्रथम, तर मोहिनी गणेश जाधव यांना द्वितीय क्रमांकाची मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, भाजपचे मोहन सूर्यवंशी, निजामपूरचे सरपंच अजितचंद्र शहा, उपसरपंच रजनी वाणी, जैताणेचे सरपंच संजय खैरनार, उपसरपंच नानाभाऊ पगारे, छडवेलचे सरपंच माळचे, उपसरपंच श्रीमती बेडसे, चिपलीपाड्याचे सरपंच ताराचंद गांगुर्डे, उपसरपंच गौरी गांगुर्डे आदींनी तनिष्का व्यासपीठाची भूमिका समजावून सांगत निवडणुकीसाठी सहकार्य केले.

केंद्रनिहाय अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकाची मते मिळालेल्या तनिष्का
शिरपूर ः हर्षाली रंधे, पद्मा सूर्यवंशी
निजामपूर ः उषाबाई ठाकरे, मालूबाई शिरसाट
जैताणे ः छाया कोठावदे, मोहिनी जाधव
छडवेल कोर्डे ः संगीता साळुंखे, भाग्यश्री बेडसे
चिपलीपाडा ः लीला सूर्यवंशी, सीमा चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com