तरुण पोलिस कर्मचाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

तरुण पोलिस कर्मचाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या 

जळगाव : वरणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत जितेंद्र ऊर्फ जीवन देवमन सोनवणे (वय 28) या पोलिस कर्मचाऱ्याने रेल्वेपुलालगत रात्री साडेनऊला सुपरफास्ट रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली. जितेंद्रच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून कौटुंबिक कलहातून त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. 

तरुण पोलिस कर्मचाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या 

जळगाव : वरणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत जितेंद्र ऊर्फ जीवन देवमन सोनवणे (वय 28) या पोलिस कर्मचाऱ्याने रेल्वेपुलालगत रात्री साडेनऊला सुपरफास्ट रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली. जितेंद्रच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून कौटुंबिक कलहातून त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. 

जळगाव शहरातील साईनगर भागात (प्लॉट.नं.14, गट.नं.112) वास्तव्याला असलेल्या जितेंद्र ऊर्फ जीवन देवराम सोनवणे हे वरणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. वडील देवमन कौतीक सोनवणे लोहमार्ग पोलिसांत कार्यरत दोन बहीणींचे विवाह झालेले, दोघांचा एकुलता लाडाचा भाऊ जितेंद्रचे गेल्यावर्षीच लग्न झाले. वडिलोपार्जित शेती आणि वडीलही पोलिस खात्यात असल्याने आर्थिक अडचणीचा प्रश्‍नच नाही. नाईट ड्यूटी असल्याने दिवसभर जितेंद्र घरीच होता, रात्री वरणगाव येथे ड्यूटीला जातो असे सांगून तो संध्याकाळी घरातून निघाला होता. रात्री दहाच्या सुमारास तालुका पोलिसांतर्फे सोनवणे कुटुंबीयांना फोन आला आणि कुटुंबात एकच आक्रोश होऊन जितेंद्रचे आईवडिलांची शुद्ध हरपली. जितेंद्रचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पाठोपाठ मित्रपरिवार परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. 

पोलिसांनाही अश्रू अनावर 
रात्री 9.20 मिनिटांनी उपस्टेशन प्रबंधक एम. ए. वर्मा यांनी धावत्या रेल्वेखाली तरुणाने उडी घेतल्याचे कळविल्याचे तालुका पोलिसांत मेसेजद्वारे घटना कळविल्यानंतर उपनिरीक्षक विजय देशमुख, वासुदेव मराठे, राजेंद्र बोरसे आदींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गिरणापंपींग रोडवरील रेल्वेपुलाच्या अलीकडे गॅस गुदामासमोर अप रेल्वे रुळावर (414/28) जवळ एका छिन्न विच्छन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेह गोळा करून अंधारात त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न केल्यावर वासुदेव मराठे यांनी जितेंद्रला ओळखले, कौटुंबिक संबंध असलेल्या जितेंद्रने आत्महत्या केल्याचे पाहताच त्यांनाही अश्रू अनावर होऊन त्यांनी पोलिस ठाण्यात घटना कळवून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. जितेंद्र चार वर्षापूर्वीच 2014 च्या बॅच मध्ये पोलिस दलात भरती झाल्याने त्याच्या मित्र परिवाराला माहिती कळताच तीन चारशे तरुणांची गर्दी जिल्हा रुग्णालयात एकवटली होती. मित्राच्या मदतीला सदैव तयार असणाऱ्या जितेंद्रचा मृतदेह बघितल्यावर त्याच्या मित्रांनी हंबरडा फोडला. 

दोन बहिणींचा लाडका 
जितेंद्रचे वडील देवमन सोनवणे रेल्वे पोलिसात कार्यरत असून कुटुंबात दोन बहिणीचा एकुलता लाडका भाऊ होता. बहिणींचा विवाह होऊन त्या सासरी गेल्या. तर जितेंद्रचे गेल्याच वर्षी धुमधडाक्‍यात लग्न झाले होते. जितेंद्रच्या मृत्यूची बातमी कळताच रात्री सव्वा अकराच्या सुमारास बहिणींनी रुग्णालयात धाव घेतली. एकदा तरी भावाला भेटू द्या... म्हणून त्यांनी टाहो फोडला होता. 
------ 

Web Title: tarun