सर्वपक्षीयांचे तात्या टोपे स्मारकाची जागा बदलावर एकमत

Yeola
Yeola

येवला : येथील भूमिपुत्र थोर सेनांनी सेनापती तात्या टोपे यांचे येथे होणारे साडेदहा कोटींचे भव्य स्मारक पालखेड कॉलनीच्या जागेत व्हावे यासाठी नगराध्यक्षासह सर्वपक्षीयांनी होकार दर्शवित एकमत केले आहे. हा निर्णय सर्वस्वी पालकमंत्र्यांच्या हातात असल्याने आता जागा बदलाचा चेंडू पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या कोर्टात पोहोचला आहे.

येथील स्मारक साठवण तलावालगतच्या अडगळीच्या जागेत होऊ नये यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीने कंबर कसली आहे. यातूनच समितीने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक जेष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली होती. समन्वयाने पाठपुरावा करण्याचे धोरण या बैठकीत ठरले.

व्यासपीठावर नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, सुशील गुजराथी,
मुकुंद गंगापुरकर, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, शिवसेना नेते संभाजीराजे पवार, प्रभाकर झळके, समिती अध्यक्ष आनंद शिंदे, श्यामसुंदर काबरा होते. प्रारंभी सेनापती तात्या टोपे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.  
माजी नगराध्यक्ष,समितीचे सरचिटणीस  लोणारी यांनी 2050 पर्यतची शहराची लोकसंख्या विचारात घेवून पुढच्या पाणीटप्पा नियोजनासाठी पालिकेने स्मारकासाठी प्रस्तावित केलेल्या जागेची गरज पडणार आहे. 

तसेच वर्दळ नसलेला हा परिसर निर्मनुष्य असून सुरक्षित नसल्याने स्मारक नासिक-औरंगाबाद रस्त्यावर जलसंपदा विभागाच्ग्या जागेत व्हावे अशी भूमिका मांडली.
नगरसेवक प्रमोद सस्कर यांनी निधी परत जावू नये म्हणून हा ठराव वरिष्ठांच्या सांगण्यावरून केल्याचे सांगत जागा बदलासाठी सहमती दर्शविली. शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी पालिकेने ठराव केलेली जागा अयोग्य असून समितीने सुचवलेली जलसंपदा विभागाची जागी स्मारक होण्यासाठी शिवसेना समितीबरोबर असल्याचे सांगितले.हीच भूमिका नगरसेवक रुपेश लोणारी,नगरसेविका शीतल शिंदे यांनी मांडले. गंगापुरकर यांनी परस्परांना विश्वासात घेवून निर्णय घेण्याचे आवाहन केले.

समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे यांनी स्मारकाच्या जागा बदलाचा ठराव करण्यास नगराध्याक्षांसह नगरसेवकांनी अनुकूल भूमिका घ्यावी असे आवाहन केले. नगराध्यक्ष क्षीरसागर यांनी निधी परत जावू नये म्हणून साठवण तलावालगतच्या पालिकेच्या मालकीच्या जागेचा ठराव केला.पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जागेबाबतचा निर्णय ठरवला तर सध्या चालू असलेली प्रक्रिया थाबेल असे स्पष्ट केले.
नियोजित जागा गैरसोयीची आहे.सव्वा वर्ष पालिकेने या स्मारकाच्या जागेसाठी पाठपुरावाच केला नव्हता. समन्वय सभेत एकविचार झाला ही आनंदाची बाब आहे. प्रशासकीय मान्यता मिळाली तर कामं थांबवता येणार नाही.पालखेड वसाहतीची जागा निश्चित व्हावी अशी सर्वांची भावना असून जागा बदलासाठी राष्ट्रवादी समितीबरोबर आहे असे माणिकराव शिंदे यांनी सांगितले. सूत्रसंचलन राहुल लोणारी यांनी केले. आभार गणेश खळेकर यांनी मानले. राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. संकेत शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, सचिन शिंदे, रूपेश लोणारी, झामभाऊ जावळे, प्रमोद सस्कर, अमजद शेख, शफिक शेख, निसारभाई लिंबुवाले, रूपेश दराडे, प्रवीण बनकर, प्रशांत शिंदे, अविनाश कुक्कर, गणेश गायकवाड, नगरसेविका सरोजिनी वखारे, छाया देसाईपुष्पा गायकवाड, छाया क्षीरसागर, पद्मा शिंदे, डॉ. किशोर पहिलवान, युवराज पाटोळे, धीरज परदेशी, दिनेश परदेशी, संजय सोमासे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com