तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मालेगाव - पॅनलबोर्ड खराब झाल्याने शहरातील पाणीपुरवठा करण्यात आज व्यत्यय आला. मध्यरात्री बाराच्या सुमारास या तांत्रिक बिघाडामुळे वीजपंप बंद पडले. यामुळे शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, निहालनगर, पाचलाख जलकुंभ व नवापुरा भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने या भागातील रहिवाशांचे हाल झाले. दुपारी महापालिका प्रशासनाने शहरात रिक्षा फिरवून पाणीपुरवठा विलंबाने होईल याबाबत माहिती दिली.

पॅनलबोर्ड दुरुस्तीसाठी वीज व पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. दुपारी साडेतीनला दुरुस्ती झाल्यानंतर गिरणा पंपिंगमधून सायंकाळी सहाला शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोचले. यामुळे तब्बल १६ तास पुरवठा विस्कळित झाला. सायंकाळी सातनंतर विविध भागांत टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात आला, असे पाणीपुरवठा अभियंता जहीर अन्सारी यांनी ‘सकाळ’ला सांगितले. १६ तासांच्या व्यत्ययानंतर विविध भागांतील पाणीपुरवठा सुरळीत व निर्धारित वेळेवर होण्यासाठी किमान तीन दिवस लागतील. शहरवासीयांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त रवींद्र जगताप व श्री. अन्सारी यांनी केले.