मालेगावात पुन्हा तापमानात वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

मालेगाव - शहर व परिसरात तापमानाने पुन्हा उसळी घेतली. कालच्या तुलनेने पारा एक अंशाने वाढला. आज येथे 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. वाढत्या तापमानात भारनियमनाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात तातडीच्या भारनियमनाच्या नावाखाली रोज सात ते आठ तास पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

येथे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून तापमान 40 अंशांपेक्षा अधिक आहे. वाढत्या तापमानाचा जनजीवनावर मोठा परिणाम जाणवत आहे. दुपारी रस्त्यावरचे दळणवळण व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. सुटीचा दिवस असल्याने आज येथे वीज कंपनीकडून अनेक खोळंबलेली कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे काही भागांत चार ते आठ तास पुरवठा खंडित करण्यात आला होता. पूर्वसूचना न दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.