यावर्षी लग्न तिथींची संख्या घटली!

रोशन भामरे  
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पंचांगानुसार वैशाख शुद्ध चतुर्थीपासून म्हणजेच ता. १९ एप्रिलपासून विवाह मुहूर्त सुरु होत झाले आहेत.

तळवाडे दिगर - यंदाच्या लग्नसराईत धोंडा महिना असल्याने ऐन महिन्यात विवाह मुहूर्त कमी असून सध्या अनेक ठिकाणी कार्यालये बुक करणे, मिळेल त्या मुहूर्तावर लग्न सोहळे उरकण्यावर भर दिला जात असून १२ मे पर्यंत फक्त १७ लग्नतिथी असल्याने बँडपथके, मंडप, हारवाले, घोडामालक, भटजी, केटरर्स, आचारीमंडळीना तेजीचे दिवस आले आहेत.
     
पंचांगानुसार वैशाख शुद्ध चतुर्थीपासून म्हणजेच ता. १९ एप्रिलपासून विवाह मुहूर्त सुरु होत झाले आहेत. यामध्ये ता. २०, २४, २५, २६, २७, २८, ३० एप्रिल हे एप्रिल महिन्यातील ता. १, २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२ मे पर्यंत असे येत्या २४ दिवसात १७ मुहूर्त आहेत. 
   
सध्या अनेक ठिकाणी कार्यालये व अन्य बाबींचे मोठ्या प्रमाणत बुकिंग झाल्याने नवीन लग्न जुळणाऱ्या वधूवर मंडळीची कार्यालये शोधताना आताच दमछाक होत असून, मागील महिन्यात १० मुहूर्त होते पण परीक्षांच्या हंगामामुळे त्यावेळी कमी विवाह सोहळे झाले, यावर्षी दि. १६ मे ते १३ जून या कालावधीत धोंडा महिना असल्याने यादरम्यान एकही विवाह मुहूर्त नाही. त्यानंतर १५ जून ते १८ जुलै या कालावधीत फक्त ११ विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे लग्न मालकांना तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे. सध्या मात्र एकाचदिवशी अनेक विवाह मोठ्या प्रमाणात असून नेमके जायचे कुठे असा प्रश्न नातेवाईक मंडळीला पडला आहे. अनेक ठिकाणी सकाळ, दुपार व सायंकाळचे मुहूर्त काढून ते उरकण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नातेवाईक, मित्रमंडळी, राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची यामुळे चांगलीच तारांबळ उडणार आहे.

जुलैनंतर थेट डिसेंबरमध्येच मुहूर्त... 
यंदा जुलैनंतर थेट डिसेंबरमध्ये विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे तीन महीन्यातील २७ मुहूर्तावर लग्नसमारंभ उरकले जाणार आहेत. त्यामुळे मोठी धांदल उडणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is no appropriate time for marriage

टॅग्स