थर्माकोलचे खान्देशातील पहिले घर सोनगीरला

thermocol
thermocol

सोनगीर (जि. धुळे) : थर्माकोलचा उपयोग करून खान्देशातील पहिले घर येथे बांधण्यात येत असून, वाळू, वीट, पाणी व सिमेंटचा कमीतकमी वापरामुळे ते घर पर्यावरण पूरक तर आहेच पण कमी कालावधीत उभे राहत असल्याने खर्च ही कमी होत आहे. मजबूती अथवा वजन सहन करण्याची ताकद सिमेंटच्या अन्य पध्दतीने बांधलेल्या पक्क्या घरापेक्षा तिप्पट जास्त असते.

परदेशात अथवा भूकंप प्रवण देशात अशा प्रकारची घरे बांधण्यास प्राधान्य दिले जाते. भारतातही यापध्दतीच्या घरांनी प्रवेश मिळवला आहे. सोनगीरच्या भाचीने राज्यात हा प्रयत्न केला आहे. येथील हॉटेल सुरभीचे मालक लक्ष्मीकांत श्रीरंग पाटील यांनी त्यांच्या ढाब्याशेजारी प्रवाशांना मुक्कामासाठी स्वस्त दरात धर्मशाळा उपलब्ध करून दिले आहे. या धर्मशाळेच्या विस्तारीत बांधकाम त्यांनी मुंबईच्या विजयशील कंपनीला दिला आहे. ही कंपनी त्यांची भाची अपेक्षा पाटीवर व जावई प्रणव पाटीदार यांनी स्थापन केली आहे. भाचा कुशल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाते. 

घर बांधण्याची पध्दत
आपल्याला कशी इमारत हवी आहे, त्यात कोणत्या सोयी सुविधा हव्यात याचा आराखडा आधी तयार केला जातो. त्यानुसार हव्या त्या आकारातील आधीच तयार थर्माकोलच्या भिंती मागवल्या जातात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अवघे दोन मजूर भिंती उभ्या करु शकतात. मजूरांना पुर्वानुभवाची गरज नाही. या भिंती म्हणजे तारांच्या जाळीत फीट केलेले थर्माकोल असते. भिंत उभी राहिल्यानंतर त्यावर दोन्ही बाजूंनी सिमेंटचे प्लास्टर केले जाते. त्यामुळे भिंत अभेद्य व पक्की बनते. अन्य पध्दतीत भिंत बांधताना वीटांचा जो उपयोग होतो याठिकाणी तेच कार्य थर्माकोल करते. त्यामुळे भिंतींचे वजन अत्यंत कमी होते. स्लॅब देखील तारांच्या जाळीतील थर्माकोलचा तयार मिळतो. वरुन व आतून सिमेंटचा थर लावला जातो. थर्माकोल मुळे घराला हवे तसे व प्रवेश द्वारावर गोल, त्रिकोण, चौकोन, षटकोणी आकार देता येतो.

उपयोग
सर्वात महत्त्वाचे उपयोग म्हणजे भूकंप झाल्यास घर पडत नाही. भिंती वक्र होतील पण पडणार नाहीत. व त्या हलक्या असल्याने जखमी होण्याचा धोका नाही. घर तापमान नियंत्रक असते. पाणी गाळण्याचा धोका नाही. आग उपद्रव नाही. घुशींचा त्रास नाही. साउंड प्रुफ आहे. अल्पावधीत बांधकाम होते. तारांच्या जाळीमुळे घरफोडी करणे निव्वळ अशक्य आहे. राज्यात अशा पध्दतीने घर बनविण्याकडे कल वाढला आहे. 

विदेशी तंत्रज्ञानावर आधारित थर्माकोलचा उपयोग करून घर बांधण्याची पध्दत राज्यात आली आहे. हवी तेवढी इमारत उभी करता येते. सध्या थर्माकोलचा भिंती परदेशातून आयात केल्या जातात. पण लवकरच भारतात त्या तयार मिळतील. तेव्हा गरीबांना त्यांच्या स्वप्नातील स्वस्त घरे मिळतील. 
- अपेक्षा पाटीदार, प्लॅनर अॅण्ड डिझायनर, विजयशील बिल्डर्स, ऐरोली मुंबई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com