जमीन बळकावून आजी-माजी नगरसेवकांची महिलेला धमकी 

जमीन बळकावून आजी-माजी नगरसेवकांची महिलेला धमकी 

नाशिक : भाजपाचे विद्यमान नगरसेवकासह एक माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यासह चार संशयितांनी दसक शिवारातील जागा बळकावली आणि त्यावर प्लॉट पाडून त्यांची परस्पर विक्री केली. सदरची बाब जागा मालकाच्या लक्षात आली असता त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेला संशयितांनी शिवीगाळ करीत, हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसात नगरसेवक दिनकर आढाव (58, रा. आढाव मळा, नारायण बापू नगर, कॅनलरोड, जेलरोड), सामाजिक कार्यकर्ता विलासराज मोहन गायकवाड (45, रा. पिंपळपट्टी रोड, दसक, मोरेमळा, जेलरोड), दीपक विष्णू सदाकळे (42, रा. चंद्रकलम सोसायटी, देशमुख भवन, तलाठी ऑफीसशेजारी, जेलरोड), माजी नगरसेवक पवन चंद्रकांत पवार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सीमा भगवान गांगुर्डे (रा. सरस्वती कॉलनी, कॅनल रोड, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दसक शिवारातील महापालिकेच्या हद्दीतील सर्व्हे नंबर 79/17 या क्षेत्रातील 00.21 आर ही मिळकत आहे. संशयितांनी सदरच्या मिळकतीचे बनावट कागदपत्रे बनवून गेल्या 7/8 वर्षांपासून बेकायदेशीरपणे कब्जा करून बळकावून ठेवली आहे. तर, माजी नगरसेवक व भारिप बहुजन महासंघाचा जिल्हाध्यक्ष पवन पवार याने सदरील मिळकतीचे प्लॉट पाडून त्यांची गुंठेवारीने विक्री केली आहे. प्रत्यक्षात सदरची मिळत पवार याच्या नावावर नसतानाही त्याने या जागेची परस्पर विक्री केली असून सध्या त्या जागेवर 12 ते 15 घरे बेकायदेशीररित्या बांधली गेली असून लोक त्याठिकाणी राहत आहेत. 

तक्रारदार जागेची पाहणी करण्यासाठी गेल्या असता त्यांना सदरचा प्रकार निदर्शनास आला. संशयित विलासराज गायकवाड याच्याकडे चौकशी केली असता, त्याने 52 लाख रुपयांना मिळकत नगरसेवक दिनकर आढावकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्याबाबत तक्रारदाराने नगरसेवक आढाव यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी शिवीगाळ करीत अरेरावी केली. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची फिर्याद दिली असून त्यानुसार आजी-माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com