पोलिसांची साडेतीन हजारांवर फौज तैनातीला

पोलिसांची साडेतीन हजारांवर फौज तैनातीला

जळगाव - यंदा गणेशोत्सव व बकरी ईद सोबत साजरी होत आहे. एकूणच जिल्ह्याची परिस्थिती, सोशल मीडियाचा वाढता उपद्रव आणि त्यातून घडणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न आदींचा अभ्यास करीत जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यात २०९५ सार्वजनिक व खासगी गणेश मंडळांद्वारे गणेशोत्सव साजरा होत आहे. सण- उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार उपसत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून समाजकंटकांना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव, बकरी ईद सण-उत्सवकाळात अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलिस दलाने तयारी पुर्ण केली आहे. संपुर्ण जिल्ह्यात साडेतीन हजारावर पोलिस, राज्य राखीव दल, होमगार्ड बंदोबस्त कामी तैनात करण्यात आले असुन कुठलेही अनुचीत प्रकार घडूनये याकरीता विशेष खबरदारी घेण्याच्या सुचना प्रभारी अधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलिस ठाणे निहाय शांतता समीतीच्या बैठका घेण्यात येवुन संबधीतांवर जबाबदारी निश्‍चीत करण्यात आली आहे. 

कारवाई प्रस्तावित नोटीस बजावणी  

पोलिस दलाच्या प्रस्तावित प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत कलम-१०७ प्रमाणे ७३०, कलम-११० प्रमाणे ३००, परिसर बंदी-५००, दारूबंदी-२०० यासहीत एकुण १५९७ गुंडाच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून, हद्दपारीचे ६२, ‘एमपीडीए’चे २ प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. तसेच मोक्का कायद्यानुसार करण्यात येणाऱ्या कारवाईचे दोन प्रस्ताव तयार झाले आहे. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशीच पंधरा दिवसांसाठी (५ ते १५ सप्टेंबर) दरम्यान ५६ गुन्हेगारांना हद्दपारीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.  

सीसीटीव्ही सर्वेलन्स 

गणेशोत्सव मिरवणूकमार्गावर जळगाव, अमळनेर, रावेर, भुसावळ, यावल या ठिकाणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच ध्वनिप्रदुषण मोजण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात डेसिबल मीटर देण्यात येणार आहे. ‘डी.जे.’ला यावर्षीही बंदी कायम आहे. 

पोलिस अधीक्षक ०१

अप्पर पोलिस अधीक्षक  ०२

पोलिस उपधीक्षक ०९

पोलिस निरीक्षक ३२

सहाय्यक निरीक्षक ५३

पोलिस उपनिरीक्षक ८८

पोलिस कर्मचारी पुरुष  १८५०

पोलिस महिला पोलिस  १५०

होमगार्ड पुरुष/महिला  १२००

राज्य राखीव पोलिस बल कंपनी (१००)

आरसीपी,स्ट्रायकिंग फोर्स एकुण ११ प्लाटून

क्‍यूआरटी फोर्स ०२ प्लाटून

बाहेरील जिल्ह्यांतील निरीक्षक ०६

नवप्रविष्ट पोलिस कर्मचारी ३०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com