वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 360 वृक्षांवर कुऱ्हाड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

नाशिक - सिंहस्थानिमित्त शहरात नव्वद किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले असले, तरी रस्त्यात येणाऱ्या वृक्षांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत झाडांवर वाहने आदळून अनेकांना प्राण गमवावा लागला.

उच्च न्यायालयाच्या नियमानुसार महापालिकेने अनेक भागांत वृक्ष लावण्यास सुरवात केली आहे. त्या आधारे आता प्रमुख रस्त्यावरील वृक्षतोडीला सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 360 झाडे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांच्या मागणीनुसार गंगापूर रोडवरील झाडे तोडली जात आहेत. 

सिंहस्थात शहरात रिंगरोड तयार करण्यात आले. रस्ता रुंदीकरण करताना मोठी झाडे येत असल्याने त्यावर कुऱ्हाड चालविण्यास काही वृक्षप्रेमींनी हरकत घेत उच्च न्यायालयातसुद्धा दाद मागितली. न्यायालयाने वृक्षतोडीवर बंदी आणताना महापालिकेला एका वृक्षतोडीच्या बदल्यात अधिक उंचीची झाडे लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने रुंदीकरणातील हटवायच्या झाडांच्या बदल्यात एकवीस हजार झाडे लावण्यास सुरवात केली. आतापर्यंत वीस हजारांहून अधिक झाडे लावल्याने महापालिकेकडून आता रस्त्यात येणारी झाडे तोडण्यास सुरवात केली. एक हजार 145 झाडे हटविली जाणार आहेत. त्यातील 360 झाडे तोडली जाणार आहेत. गंगापूर रोड, दिंडोरी रोड, त्र्यंबक रोड, टाकळी रोड या भागातील झाडे हटविली जातील.