NMIMS चे शेतकऱ्यांना दिले प्रशिक्षण व माहिती

NMIMS चे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व माहिती
NMIMS चे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व माहितीesakal

मुंबई : NMIMS स्कूल ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी (शिरपूर) तसेच भारत पेट्रोलियमतर्फे कळमसरे येथे नुकतीच शेतकरी संवादी कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना विविध बाबींचे प्रशिक्षण व माहिती देण्यात आली.

NMIMS स्कूल चे डीन डॉ. एस. देसाई यांनी मातीचा कस, पाणी व्यवस्थापन तसेच शेतीला उपयुक्त असलेल्या कीटक व अन्य जीवांची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या संरक्षणाची गरज स्पष्ट केली. रवींद्र राजपूत (सरपंच, कळमसरे), श्री. राजेंद्र पाटील (सरपंच, अजनाद), श्री. गजानन भावसार, श्री. प्रमोद भारी, श्री. प्रभाकर भारी, श्री. सुधाकर गानू यांनीही शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धतीची माहिती दिली.

NMIMS चे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व माहिती
जळगाव : बोगस बियाण्यांबाबत सतर्क रहा - जिल्हाधिकारी राऊत

डॉ. कृष्ण चैतन्य यांनी शेतीला फायदेशीर ठरणाऱ्या कीटकांचे जिवंत नमुने दाखवले. कीटकांच्या निरीक्षणासाठी फेरोमोन सापळे वापरण्याचे आवानही त्यांनी केले. या फायदेशीर कीटकांना हानी पोहोचवणाऱ्या कीटकनाशकांचा मनमानी वापर कमी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. नितीन मिसाळ यांनी पोषक तत्वांच्या विश्लेषणासाठी मातीचे नमुने गोळा करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या तपासणीमुळे लागवडीचा खर्च आणि पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी केवळ गरजेनुसार खतांचा वापर करता येईल, असेही त्यांनी दाखवून दिले. सुधाकर गानू यांनी सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर करून उत्पादन कसे वाढवायचे याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

NMIMS चे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व माहिती
दृष्टिकोन : उभ्या उसाचा लागला घोर

पर्यावरणपूरक शेती, आणि वाढीव शेती नफ्यासाठी साधनांचा योग्य वापर याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम फलदायी ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. प्रदर्शनात शेकडो शेतकरी तसेच नुझिवेदू बियाणे, यूएस ऍग्रीसीड्स, सुमितोमो केमिकल्स, प्रभात ऍग्रीबायोटेक आणि इतर सारख्या अनेक प्रमुख कृषी-संबंधित कंपन्यांनी भाग घेतला आणि पीक तणाव व्यवस्थापनासाठी नवीन प्रकारचे बियाणे, पोषक खते आणि इतर नवीन उत्पादने प्रदर्शित केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com