आदिवासी बांधवांनी आपल्या अधिकाराबाबत जागृत असावे- डॉ. पंडित मोरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

सटाणा - आदिवासी समाजासमोर आज अनेक आव्हाने असून समाजातील विद्यार्थी, शेतकरी, महिला यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आदिवासी समाज संघटीत नसल्यामुळे प्रत्येक निवडणुकीत राजकीय नेते याचा फायदा उचलतात. त्यामुळे आदिवासी बांधवांनी आपल्या अधिकाराबाबत जागृत झाले पाहिजे, असे आवाहन प्रा. डॉ. पंडित मोरे यांनी आज येथे केले. येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंगल कार्यालयात काल रविवार (ता.१०) रोजी आयोजित आदिवासी बांधवांच्या चिंतन बैठकीत प्रा.डॉ.मोरे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक बाळासाहेब बागुल तर प्रमुख पाहुणे पंचायत समिती सभापती विमलबाई सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार, प्रवीण पवार, निंबा माळी, मोरेनगरचे सरपंच सुरेश जाधव, बाभूळणेचे सरपंच गणपत पवार, यशवंत पवार सोमनाथ सोनवणे, शांताराम सोनवणे, रमेश नवरे, दिलीप सोनवणे, राजेंद्र माळी, साहेबराव अहिरे, आदि होते. 

प्रा. डॉ. मोरे म्हणाले, आदिवासी समाज आजही शिक्षणापासून दूर आहे. समाजातील प्रत्येकाला हक्काचे शिक्षण, आरक्षण व विविध योजनांचा लाभ मिळाल्यास आर्थिक व सामाजिक विकासाची गंगा प्रत्येक आदिवासी बांधवाच्या घराघरात पोहोचू शकेल. त्यामुळे असंघटीत असलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची आज खरी गरज आहे. असेही प्रा. डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले. शांताराम गायकवाड यांनी आदिवासींच्या जीवनावर कविता सादर केल्या. 

बैठकीस अभिमन पवार, केदा गायकवाड, निंबा माळी, बाळू पवार, सुरेश कापडणीस, परशराम सोनवणे, विश्वनाथ पवार, पिराजी पवार, केशव पवार, देविदास चव्हाण, अशोक सोनवणे, चंदू निकम, सुनील पवार, शिवराम पवार, चैत्राम पवार, कार्तिक कुवर, अर्जुन वाघ, विशाल माळी, बाबुराव माळी, दत्तू बर्डे, शंकर सोनवणे, मीराबाई बोरसे, सागर गायकवाड, अनिल मलिक, विठ्ठल कुवर, वसंत बोरसे, जितेंद्र मोरे आदींसह तालुक्यातील आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. वसंत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. सिद्धार्थ जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Tribal brothers should be aware of their rights - Dr. Pandit More