नववर्षाच्या प्रारंभी दोघांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

नाशिक - नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना मुंबई-आग्रा महामार्गावर पाथर्डी फाटा व एक्‍स्लो पॉइंट मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला.

नाशिक - नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना मुंबई-आग्रा महामार्गावर पाथर्डी फाटा व एक्‍स्लो पॉइंट मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला.

गणेश साहेबराव धारराव (वय 30, रा. नरहरीनगर, पाथर्डी फाटा) हे रात्री उड्डाण पुलावरून पाथर्डी फाट्याकडे येत असताना, पुलावर उभ्या असलेल्या कंटेनरवर (एमएच 06 एसी 8492) त्यांची दुचाकी (एमएच 15 एफके5099) धडकली. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात दुचाकीवरून (एमएच 15 बीआर 4144) घराकडे परतताना नारायण त्र्यंबक थोरात (वय 45, रा. गणेश चौक, सिडको) यांना एक्‍स्लो पॉइंट येथे वेगात चाललेल्या एका दुचाकीने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेले थोरात यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.