मेहुणबारे गिरणा पुलाजवळ डंपरची दुचाकीला धडक; दोन जखमी 

दीपक कच्छवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मेहुणबारे चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या गिरणा पुलाजवळ डंपर क्रमांक ( GJ 05 AT 2530) ने दुचाकी क्रमांक (MH.19 CK 2350)हीला धडक दिली. त्यानंतर डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर देखील पलटी झाला आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव-धुळे महामार्गवर डंपर दुचाकीला धडकली. डंपर चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला पलटी झाले. यात शिदवाडी (ता.चाळीसगाव)  येथील पती पत्नी जखमी झाले आहेत.

मेहुणबारे चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या गिरणा पुलाजवळ डंपर क्रमांक ( GJ 05 AT 2530) ने दुचाकी क्रमांक (MH.19 CK 2350)हीला धडक दिली. त्यानंतर डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर देखील पलटी झाला आहे.

दुचाकीवरील शिवदास पतिंग पाटील व कल्पना पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल गोरक चकोर यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून चाळीसगाव येथे रूग्णालयात रवाना केले.

Web Title: two injured in accident chalisgaon