रोटरी क्लब व ग्रीन रिव्होल्युशन तर्फे चुंचाळेत दोन हजार रोपांची लागवड

Two thousand seedlings in Chuchale from Rotary Club and Green Revolution
Two thousand seedlings in Chuchale from Rotary Club and Green Revolution

सिडको (नाशिक) - पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि ग्रीन रिव्होल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज अंबड औद्योगिक वसाहतीजवळील चुंचाळे टेकडीवर दोन हजार रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी रोपांची लागवड तर केलीच शिवाय टेकडीवरील सर्व प्लास्टिक पिशव्याही गोळा करून मोठ्यासमोर आदर्श निर्माण केला.

रोटरी क्लबच्या नवीन अध्यक्षांच्या कार्यकाळाची सुरवात ही १ जुलैस वृक्ष लागवडीने होत असते. क्लबची ही परंपरा कायम ठेवतानाच वाढत्या प्रदूषणास आळा बसावा आणि पर्यावरणाचे संवर्धन यशस्वीरीत्या व्हावे यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि ग्रीन रिव्होल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी इपिसी कंपनी शेजारील चुंचाळे टेकडीवर सुमारे दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली. यात विविध भारतीय प्रजातींचा समावेश असलेली रोपे निवडण्यात आली. रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि ग्रीन रिव्होल्युशनच्या सदस्यांनी यापूर्वीच श्रमदानातून या टेकडीवर दोन हजार खड्डे खोदले होते. बेळगाव ढगा गावाचे सरपंच दत्तू ढगे यांनी प्रारंभी रोपाची लागवड कशा पद्धतीने करायची याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. यानंतर रोटरी सदस्यांनी हातात टिकाव, फावडे आणि पाण्याचे ड्रम घेवून टेकडीवर रोपे लावण्यास सुरवात केली.

नाशिक रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले, दिलीपसिंह बेनीवाल, प्रफुल्ल बरडिया, राज तलरेजा, रफिक व्होरा, विवेक जायखेडकर, वैशाली चौधरी, अश्विन अलई, दीपक सोनार, गौरव सामनेरकर, माधवी सुकेणकर, वैशाली रावत रामकुमार, हेमराज राजपूत, गौरी पाठक, मंगेश अपशंकर आणि संजय अग्रवाल तसेच ग्रीन रिव्होल्युशनचे सदस्यांनी रोपांची लागवड करण्यासाठी हातभार लावला.
चिमुकल्यांकडून लागवड आणि प्लास्टिक मुक्तीही यावेळी करण्यात आली. यावेळी रोपांची लागवड करताना टेकडीवरील रोपांच्या रिकाम्या प्लास्टिक पिशव्याही लागवड करण्यासाठी आलेल्या लहान मुलांनी गोळा केल्या. या कार्यात आज सार्वजनिक सुटी असल्याने लहान मुलांनीही अनेक रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे ही चिमुकली मंडळी स्वतः मोठ्या उत्साहाने पुढाकार घेत होती. विशेष म्हणजे वृक्ष लागवडीनंतर या रोपांची जोपासना करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. लागवड केलेल्या रोपांची जोपासना करणे, संरक्षण करणे यावर भर देण्यात आल्याची माहिती जनसंपर्क संचालक संतोष साबळे यांनी दिली.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com