वनमहोत्सवाअंतर्गत बागलाण तालुक्यास ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

tree
tree

सटाणा : राज्यात महिना भर चालणाऱ्या 13 कोटी वृक्षलागवड वनमहोत्सवास बागलाण तालुक्यात उत्साहात प्रारंभ झाला. तालुक्याला 822 हेक्टर क्षेत्रावर 9 लाख 40 हजार 700 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दोधेश्वर (ता. बागलाण) येथील कोळीपाडा शिवारात बागलाणच्या आमदार दिपिका चव्हाण यांचे हस्ते वृक्षलागवडीचा प्रारंभ करण्यात आला. या ठिकाणी 50 हेक्टर क्षेत्रावर पंचावन्न हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. साठे, वनपाल डी. एस. केसकर, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या ऊषा भामरे, शमा दंडगव्हाळ, वनरक्षक ममता बोडके, रामा मानकर, कृष्णा काकुळते आदि उपस्थित होते.

बिघडलेल्या पर्यावरणाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन शासनाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असला तरी गेल्या वर्षी वृक्ष लागवड केलेल्या किती रोपांचे संवर्धन झाले हा संशोधनाचा विषय आहे. मागील वर्षी लागवड केलेल्या वृक्षांपैकी ५० टक्के जगली नसून मागील वर्षी खोदलेले खड्डे उकरून खड्यांची मजुरी खर्चीला लावीत वनक्षेत्रपालांनी टाकली असल्याचे वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पेसा अंतर्गत ग्रामपंचायतीनी लावलेल्या वृक्षांचे वनसंरक्षण समितीचे कामकाज कमकुवत असल्याने वृक्षसंरक्षणच झाले नाही. 

मागील वर्षी वृक्ष लागवड केली मात्र ती भोरो साठीच यशस्वी झाली. वृक्षलागवड केली परंतु संवर्धनाकडे कोणत्याही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून वृक्ष लागवड करूनही तिचे संवर्धन न झाल्याने ही योजना यशस्वी होत नाही. वृक्षलागवड संपली की लागवडीच्या वेळी पाण्यात बुडालेली रोपे काही दिवसांनी कोमेजून जातात व मरून जातात. दर वर्षी वृक्षलागवडीसाठी शासनाकडून निधी येतो झाडे लावली जातात. बोटावर मोजण्या इतकीच झाडे जिवंत असतात. विविध विभागांनी व ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीचे महत्व जाणून घेऊन हवामान, जमीन, पाण्याचा अभ्यास करून वृक्ष लागवडीचे नियोजन केले पाहिजे. कुठल्या जागेवर कोणत्या प्रजातींच्या रोपांची लागवड करावी याची माहिती असणे आवश्यक आहे.

मागील वर्षी किती वृक्षलागवड झाली त्यातील किती झाडे जगली यासाठी त्या परिसराला भेट देऊन अधिकारी वर्गा कडून त्याबाबतचे ऑडिट करावे अशी वृक्ष प्रेमींची मागणी आहे.

मागील वर्षी किती वृक्षलागवड झाली त्यातील किती झाडे जगली यासाठी त्या परिसराला भेट देऊन अधिकारी वर्गा कडून त्याबाबतचे ऑडिट करावे अशी वृक्ष प्रेमींची मागणी आहे.
                           - वृक्ष लागवडीचा गेल्या दोन वर्षांचा आढावा  
                            (वन खात्याकडून मिळालेला तक्ता)
                         २०१६-१७ (दोन कोटी वृक्ष लागवड अंतर्गत 
                      रोपांची संख्या   जिवंत रोपे संख्या    ऑक्टोबर-१७ अखेर जिवंत  
             मालेगाव    १४५५००       ११८८५५           ८१.५० टक्के
             सटाणा     २४८१००        १९२५१८           ७७.६० टक्के
             ताहाराबाद   १९०१००        १०९६१०            ८४.०० टक्के 
                         
                      - २०१७-२०१८ (४ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत)
                       रोपांची संख्या   जिवंत रोपे संख्या    ऑक्टोबर-१७ अखेर जिवंत  
             मालेगाव    ४१६१००       ३९४७९६           ९४.०० टक्के
             सटाणा     २००२००       १९५६५३           ७८.०० टक्के
             ताहाराबाद   ३३६७००      ३१३२६८            ९३.२०  टक्के 
                  
                      २०१८ - २०१९ = १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम 
                 सटाणा वनविभाग  ८२२ हेक्टर  -     ९,४०७०० रोपे
                 ग्रामपंचायत व इतर शासकीय विभाग -  १,९९८०३ रोपे

ऑक्टोबर अखेर जिवंत असलेल्या झाडांची टक्केवारी वन खात्याच्या रेकॉर्डवरची आहे. प्रत्यक्षात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com