चिंचखेडा तवा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

वाकोद (ता. जामनेर) - येथून जवळ असलेल्या चिंचखेडा तवा (ता. जामनेर) येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने काल (ता. २१) रात्री अकराला राहत्या घरी विष घेऊन जीवनयात्रा संपविली. 

वाकोद (ता. जामनेर) - येथून जवळ असलेल्या चिंचखेडा तवा (ता. जामनेर) येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने काल (ता. २१) रात्री अकराला राहत्या घरी विष घेऊन जीवनयात्रा संपविली. 

चिंचखेडा तवा येथील शेतकरी रामेश्‍वर हरिश्‍चंद्र खंडागळे (वय ३५) यांच्याकडे जेमतेम शेती आहे. शेतीतील उत्पादनातून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शेतीमुळे त्यांच्यावर दीड ते दोन लाख रुपयांचे कर्ज झाले. मात्र शेतीपासून येणारे उत्पन्न कमी असल्याने ते कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेतून त्यांनी काल आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. यासंदर्भात डॉ. प्राची सुरतवाला यांच्या माहितीवरून जिल्हापेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हवालदार पुरुषोत्तम वागळे करीत आहेत.