विदर्भाच्या विकासासाठी नाशिक भकास - राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नाशिक - विदर्भ महाराष्ट्राचाच एक भाग आहे. त्यामुळे तेथील विकासाला विरोध करण्याचे कारण नाही; परंतु दत्तक घेतलेले नाशिक भकास करून विदर्भाचा विकास होत असेल, तर असा विकास चुकीचा आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करताना यापूर्वीदेखील मुंबईतील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेल्याची आठवण करून दिली.

नाशिकमधील फार्मास्युटिकल कंपन्या नागपूरमधील मिहान प्रकल्पात पळवून नेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे वृत्त आज "सकाळ'ने प्रसिद्ध केले. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांना प्रश्‍न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात प्रतिक्रिया दिली. मुंबईतील महत्त्वाच्या कंपन्या गुजरातला पळविल्याचे सांगताना राऊत यांनी विदर्भात नवीन उद्योग हवेत, परंतु नाशिक भकास करण्याची गरज नाही. नाशिकचा घास हिरावून विदर्भात नेऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: vidarbha development nashik sanjay raut