ग्रामस्थांनी सरपंचांना कार्यालयात कोंडले 

The villagers slammed the Sarpanchs in the office
The villagers slammed the Sarpanchs in the office

मालेगाव : मागील अनेक महिण्यांपासून मालेगाव येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार लेखी, तोंडी सुचना देऊन सुद्धा पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतने सोडविला नाही. म्हणुन गुरुवारी (ता.२१) रोजी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ग्रामपंचायतच्या सरपंचांना त्यांच्याच कार्यालयात कोंडले. गेल्या दोन वर्षांपासुन ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा निधी पाणी पुरवठ्यावर खर्च करुणसुद्धा ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. त्यामुळे पाण्यासोबतच स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मागील २० दिवसांपासून गावातील इंदिरा नगर, जंगमवाडी, शिक्षक कॉलनी परिसरात पाणी पुरवठा बंद आहे. या संदर्भात महिला ग्रामपंचायतला जाब विचारण्यासाठी गेल्या असता कार्यालयात ग्रामसेवक अथवा कोणताच लोकप्रतिनिधी हजर नव्हता म्हणुन अखेर महिलांनी आपला मोर्चा महिला सरपंच उज्वला इंगोले यांच्या घरी वळविला. परंतु, त्या ठिकाणीही महिलांना अपमानास्पद वागनुक मिळाल्यामुळे महिलांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठिय्य्या मांडला. काही वेळातच सरपंच कार्यालयात सरपंच उज्वला इंगोले आल्या असता महिलांनी घोषणाबाजी करीत सरपंचांना कार्यालयातच कोंडले.

काही काळ हा प्रकार सुरुच होता. अखेर सरपंचांनी दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरपंचांना सोडण्यात आले. एकंदरीतच मालेगाव लगत दोन ते तीन लहान मोठ्या नद्या वाहत असूण सुद्धा ग्रामपंचायत पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यात अपयशी ठरली आले. त्यामुळेच पाणी प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली महिलांनी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या वेळी श्रीकांत कांबळे, स्वप्नील खंदारे, मिलींद वाहुळे, अर्जुन गायकवाड, अविनाश गजभारे यांच्यासह महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com