विनोद पाटीलला हलविले मध्यवर्ती कारागृहात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नाशिक - हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 300 कोटी रुपयांचा चुना लावलेला कंपनीचा मुख्य संचालक व फसवणुकीचा मुख्य सूत्रधार विनोद पाटील याची आज मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. विनोद पाटीलसह सर्व सचालकांची शुक्रवारी (ता. 31) सुनावणी होणार आहे. 

हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीतून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून सुमारे 300 कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधार विनोद पाटील यास मुंबईतून अटक केली. त्याच्या कोठडीची आज मुदत संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मध्यवर्ती कारागृहात यापूर्वीच कंपनीचे संशयित संचालक प्रियंका विनोद पाटील, उमा महेश नलगे-पाटील, सुशांत कोठुळे, विकास रवंदळे, अश्‍विन पेखले, नवनाथ पाटील, दिनेश सोनवणे, किरण मोर, फडोळ, राहुल दंडगव्हाळ, सतीश कामे, विजय खुमकर हेही आहेत.