विरेंद्र कानोजी उर्फ भंडारी यांची रवानगी हर्सुल कारागृहात

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

निवडणूकीनंतर महेश खोमणे यांच्यावर मोर चौकात विरेंद्र भंडारी यांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर काही दिवसांनी विरेंद्र भंडारी हे पोलिसांना शरण आले होते. त्यांची जामीनावर सुटका झाली होती.

नांदेड - भारतीय जनता पार्टीचे तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश उर्फ बाळू खोमणे यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणारा विरेंद्र सोपान कानोजी उर्फ भंडारीला स्थानबद्धता कायद्यानुसार अटक केली आहे. त्याची रवानगी औरंगाबाद हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे.  

महापालिकेच्या निवडणूकीवरून महेश उर्फ बाळू खोमणे आणि विरेंद्र भंडारी यांचा वाद पेटला होता. निवडणूकीनंतर महेश खोमणे यांच्यावर मोर चौकात विरेंद्र भंडारी यांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर काही दिवसांनी विरेंद्र भंडारी हे पोलिसांना शरण आले होते. त्यांची जामीनावर सुटका झाली होती. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषध द्रव्य विषयक गुन्हेगार, व्हीडीओ पायरेट्स, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तू काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीच्या विघातक कृत्याला आळा घालण्यासाठी अधिनियम 1981 (सुधारणा 1996, 1999, 2009, 2015), भारताचे संविधान अनुच्छेद 22 (5) कायद्यानुसार अटक केली. लगेच त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह हर्सूल औरंगाबाद येथे करण्यात आली. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यानी निर्गमित केले. पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांचे कडून या संदर्भात प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Virendra Kanoji alias Bhandari sent away in Hersul Jail