जि. प. निवडणुकीसाठी मुंबई- पुण्यातून मतदान यंत्रे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

येत्या 21 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी दोन हजार 642 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. एका केंद्रावर दोन यंत्रे ठेवली जाणार आहेत. त्यामुळे केंद्रांची संख्या पाहता पाच हजार 284 मतदान यंत्रे लागणार आहेत. मात्र, प्रशासनाकडे आजमितीस पाच हजार 621 बॅलेट आणि पाच हजार 77 कंट्रोल युनिट आहेत. 

नाशिक - जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाला पुण्यातून एक हजार 38 कंट्रोल; तर मुंबईतून एक हजार 500 बॅलेट युनिट मिळाले आहेत. वेळेत मतदान यंत्रे उपलब्ध झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. मतदान यंत्रांसाठी काही दिवसांपासून मध्य प्रदेशशी संपर्क सुरू होता. मात्र, त्यापूर्वीच मुंबई व पुण्यातून यंत्रे उपलब्ध झाली आहेत. 

जिल्हा परिषदेच्या 73 गट आणि 146 गणांत 2006 पूर्वीची यंत्रे मतदानासाठी वापरण्याचे नियोजन होते. मात्र, जिल्ह्यात उपलब्ध यंत्रांतील बरीच यंत्रे नादुरुस्त असल्याने प्रशासनाने एक हजार 500 कंट्रोल तसेच बॅलेट युनिटची मागणी केली होती. आयोगाने 500 च्या जागी दीड हजार बॅलेट, तसेच एक हजारांच्या मागणीच्या ऐवजी एक हजार 38 कंट्रोल युनिट दिल्याने प्रत्येक तालुक्‍यात दहा टक्के अधिक राखीव यंत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी यंत्रात दोष आढळल्यास राखीव यंत्रातून ही गरज भागविणे सोपे होणार आहे. निवडणूक आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला मुंबई- पुण्यातून यंत्रे आणण्याच्या सूचना आल्या. पाठोपाठ प्रशासनाला पुण्यातून एक हजार 38 कंट्रोल; तर मुंबईतून एक हजार 500 बॅलेट युनिट मिळाले आहेत. 

येत्या 21 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी दोन हजार 642 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. एका केंद्रावर दोन यंत्रे ठेवली जाणार आहेत. त्यामुळे केंद्रांची संख्या पाहता पाच हजार 284 मतदान यंत्रे लागणार आहेत. मात्र, प्रशासनाकडे आजमितीस पाच हजार 621 बॅलेट आणि पाच हजार 77 कंट्रोल युनिट आहेत. 

पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध नसल्याने प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे वाढीव 500 बॅलेट आणि एक हजार कंट्रोल युनिटसाठी मागणी केली होती. त्यानुसार आयोगाने मध्य प्रदेशातून अतिरिक्त यंत्रे आणण्याची तयारी करा, असे निर्देश दिले होते. पण, मतदानाची तारीख जवळ येऊनही आयोगाकडून यंत्रांबाबत कोणतीच सूचना मिळत नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली होती. मात्र, आता पुरेशी यंत्रे मिळाल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - यंदाच्या हज यात्रेस गेलेल्या भारतीय मुस्लिम यात्रेकरूंकडून सौदी अरेबियात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला....

02.00 AM

सोनगीर (जिल्हा धुळे): येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत गोंधळ अनावर झाल्याने ग्रामसभा मध्येच तहकूब करण्यात आली. याप्रकरणी ग्रामसभेचे...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

सोनगीर (जि. धुळे) : झोपडी जळून सर्वस्व खाक झाले. संसारोपयोगी भांडी, कपडे, अन्नधान्य, मुलांचे दप्तर एवढेच नव्हे तर रेशन कार्ड...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017