कर्जमाफी संघर्ष यात्रेत बैलगाड्यांचा सहभाग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

जळगाव - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधी पक्षातर्फे काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत पाळधी (जि. जळगाव) येथे 60 बैलगाड्यांचा सहभाग होता. बैलगाडीत बसून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांचे निवेदन स्वीकारले. 

विरोधी पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा कालपासून सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून सुरू झाला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, दिलीप वळसे-पाटील, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, रिपाइंचे जोगेंद्र कवाडे आदी यात सहभागी झाले आहेत. आज सकाळी 9 वाजता जळगावातून धुळ्याकडे ही यात्रा रवाना झाली. रस्त्यात पाळधी येथे यात्रेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी तब्बल 80 बैलगाड्यांचा सहभाग होता. अजित पवार, जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. पुढे ही यात्रा एरंडोलकडे रवाना झाली. 

Web Title: Waiver of conflict yatra