प्रभाग रचनेच्या आरक्षणाचा शुक्रवारी होणार फैसला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

नाशिक - पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी (ता. ७) काढली जाणार आहे. चारसदस्यीय ३१ प्रभागांत आरक्षण टाकले जाणार असल्याने कुठला भाग राखीव राहील, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. १२२ सदस्यांच्या प्रभागांत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ जागा राखीव राहणार आहेत. त्यात नऊ जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नऊ जागा राखीव राहणार असून, त्यातील पाच जागा महिलांसाठी राखीव राहतील.

नाशिक - पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी (ता. ७) काढली जाणार आहे. चारसदस्यीय ३१ प्रभागांत आरक्षण टाकले जाणार असल्याने कुठला भाग राखीव राहील, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. १२२ सदस्यांच्या प्रभागांत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ जागा राखीव राहणार आहेत. त्यात नऊ जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नऊ जागा राखीव राहणार असून, त्यातील पाच जागा महिलांसाठी राखीव राहतील. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षणानुसार ३३ जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, त्यातील १७ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. सर्वसाधारण गटासाठी ६२ जागा राहणार आहेत. त्यातील ३० जागा महिलांसाठी राखीव असतील.

सात ऑक्‍टोबरला सकाळी अकराला महाकवी कालिदास कलामंदिरात राखीव जागांची सोडत काढली जाईल. येथेच प्रभागांचा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी ठेवला जाणार असल्याने याचदिवशी प्रभागांच्या हद्दीही स्पष्ट होतील. सोडतीत निघालेला जागा क्रमांक सर्व उपस्थित नागरिकांना सहज दिसावा म्हणून प्रोजेक्‍टरद्वारे पडद्यावर दाखविला जाईल. ध्वनिक्षेपकावरूनही माहिती दिली जाणार आहे.

सोडतीचे टप्पे असे
अनुसूचित जातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार १८ जागा, तर अनुसूचित जमात प्रवर्गासाठी नऊ निश्‍चित झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३३ जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने जागा निश्‍चित करण्यात येतील. त्यानंतर उर्वरित दोन जागा या ज्या प्रभागात तीन जागा बिनराखीव आहेत, त्या प्रभागाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील दोन जागा सोडतीद्वारे आरक्षित करण्यात येतील. तीन जागा असलेल्या प्रभागांपैकी कोणत्या प्रभागात दोन जागा निश्‍चित होतील, ते ठरविले जाईल. महापालिकेत तीन सदस्यांचे दोन प्रभाग निवडणुकीसाठी ठेवले आहेत. त्यांपैकी कोणत्या प्रभागात महिलांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात येतील ते सोडतीद्वारे निश्‍चित होईल. आरक्षण सोडतीच्या टप्प्यांचे व्हिडिओ चित्रिकरण केले जाईल.

टॅग्स