एक्स्प्रेस फीडर जोडल्याने सोनगीरकरांना पाणीटंचाईत दिलासा 

songir
songir

सोनगीर (जि. धुळे) : पावसाळा तीन आठवड्यावर आला असताना व गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर  अखेर ग्रामपंचायतीने डाॅ. आर. व्ही. पारेख यांची अधिग्रहीत विहीरीवर विद्यूत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येऊन तो एक्स्प्रेस फीडरला जोडण्यात आला. आजपासून 24 तास वीजपुरवठा सुरू होऊन अधिग्रहीत विहीरीचे पाणी गुरुगोविंद महाराजांच्या समाधी मंदिराजवळील मुख्य विहीरीत टाकण्यात येत आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार कुणाल पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच ट्रान्सफॉर्मर बसू शकला. काही अंशी का होईना पाण्याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

तीन वर्षांपासून पाणी टंचाई असताना गेल्या दीड  महिन्यात ग्रामपंचायतीने डॉ. रमेश पारेख यांची विहीर अधिग्रहीत केली. तेव्हापासूनच तेथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य नेते, प्रशासकीय अधिकारी तथा  विद्यूत मंडळाचे अधिकारी यांच्याकडे चकरा मारत होते. पण कोणीही लक्ष दिले नाही. दीड महिन्यापासून पाणी आहे पण वीज नाही अशी स्थिती होती. विद्यूत वितरण कंपनीच्या मनमानी व अडवणूकीच्या धोरणामुळे तीव्र टंचाई असतानाही  वीज कनेक्शन न देता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी एकदा जिल्हाधिकारी कार्यालय व एकदा पंचायत समिती सभागृहात अशा दोन बैठकी घेऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना समज दिली. काँग्रेसचे येेेथील कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन पाणी टंचाई बाबत निवेदन देऊन उपाययोजना करण्याची विनंती केली होती. त्यांनीही आमदार निधीतून तीन लाख रुपये मंजूर करीत ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेेेश दिले.

सुरूवातीला वीज वितरण कंपनीने नवीन ट्रान्सफॉर्मर न बसवता दुसरा शेतकर्‍यांचा ट्रान्सफॉर्मर बदलला व त्यावरून अधिग्रहीत विहीरीला वीज पुरवठा केला. पण कमी दाबामुळे मोटार सुरू झाली नाही. त्यानंतर वीज वाहिन्या जळून गेल्या. विशेष म्हणजे तेथे केवळ आठ तास वीजपुरवठा सुरू असतो. त्यामुळे उपयोग झाला नाही. दोन दिवसांपूर्वी विहीरीजवळ ट्रान्सफॉर्मर बसला. पण एक्स्प्रेस फीडरसाठी पुन्हा एकदा वीजवितरण कंपनी अडून बसली. ग्रामपंचायतीने सुमारे एक लाख तीन हजार रुपये डिमांड भरल्यानंतर आजपासून पाणीपुरवठा सुरू झाला.  प्रभारी सरपंच धनंजय कासार यांनी मोठे परिश्रम घेतले  ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, किशोर पावनकर, संदीप गुजर, पराग देशमुख, चंद्रशेखर परदेशी, राजूलाल भील, दीपक भोई आदींनी सहकार्य केले. मात्र अधिग्रहीत विहीरीचे पाणीही जास्त दिवस पुरणार नसल्याने जवळच्या तीन विहिरी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. त्यामुळे  पाणीप्रश्नी तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे. ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी कार्यकारी अभियंता पी. एम. पाटील, अभय कासार,  विहीर अधिग्रहीत करण्यासाठी आर. के. माळी, राजेंद्र जाधव यांचे तसेच संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या कडे पंचायत समिती सदस्या रुपाली माळी, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. अजय सोनवणे, कैलास वाणी, डाॅ. युवराज नवटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, आमदार कुणाल पाटील यांचेकडे पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन,  शांतीलाल चौधरी, कैलास लोहार, हसनखान पठाण,  सजन माळी आदींचे प्रयत्न कामी आले. तीन वर्षांपासून पाणी टंचाई असताना हेच प्रयत्न यापुर्वीच केले असते तर ग्रामस्थांचे एवढे हाल झाले नसते. आता पावसाळ्याच्या तोंडावर का असेना ग्रामस्थांना पाणी मिळणार आहे हे ही नसे थोडके असेच म्हणावे लागेल. 

गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी व माझे सहकारी सदस्यांनी अथक प्रयत्न केले. आता ग्रामस्थांना निश्चितच दिलासा मिळेल. ज्यांनी ज्यांनी याकामी मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो. 
- धनंजय कासार, प्रभारी सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com